शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांना मदतीसाठी पावणेदोन कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तातडीने पूर्ण केले असून नागरिकांना मदत देण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तातडीने पूर्ण केले असून नागरिकांना मदत देण्यासाठी शासनाकडे १ कोटी ७१ लाखाची मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिली.वादळामुळे जिल्ह्यात घरांचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शहादा आणि तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात अधिक नुकसान झाले. पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी वादळग्रस्त भागांना भेट देऊन तातडीने पंचनामे करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी विविध यंत्रणांना निर्देश दिले होते. कृषी आणि महूसल विभागातर्फे पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येऊन प्रशासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे. शहादा तालुक्यात ८७ तर तळोदा तालुक्यात ४ घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. दोन्ही तालुक्यात अंशत: पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या १,११० आहे. यात ४५९ शहादा तालुक्यातील तर ६४८ तळोदा तालुक्यातील आहेत. तर तळोदा तालुक्यात एक दुधाळ जनावर मृत्यूमुखी पडले आहे. झालेल्या नुकसानाबाबत नागरिकांना मदत करण्यासाठी निकषानुसार ८१ लाखाची मागणी करण्यात आली आहे.शहादा तालुक्यात ३१९ तर तळोदा तालुक्यात २८५ शेतकऱ्यांच्या ३६२ हेक्टरक्षेत्रावरील बागायत पिकांचे (फळपिके सोडून) ३३ टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यासाठी निकषानुसार ४९ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील ३२३ शेतकऱ्यांचे फळपिकाखालील बाधित क्षेत्र २३१ हेक्टर आहे. त्यासाठी ४१ लाखांची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात वादळामुळे नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्ती किंवा पुर्नबांधणीसाठी ८० लाख ७५ हजार आणि जनावर मृत झाल्याने पशुधन खरेदीसाठी २५ हजार रुपये प्रशासनास प्राप्त झाले आहे. या मदतीचे दोन दिवसात वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार नवापूरसाठी १८ हजार, शहादा ५३ लाख ९८ हजार ८९० आणि तळोदा तालुक्यासाठी २६ लाख ५८ हजार ६१० रुपये घरांच्या दुरुस्ती किंवा पुर्नबांधणीसाठी वितरीत करण्यात आले आहेत.