प्रसूतीसाठी दवाखान्यात आली अन् बालविवाहाचं बिंग फुटलं! आई आणि पतीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 20:57 IST2025-12-19T20:57:09+5:302025-12-19T20:57:09+5:30

नंदुरबारच्या अक्कलकुव्यात बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून डॉक्टरांच्या सतर्कतेने हे प्रकरण समोर आलं.

Delivery at Hospital Exposes Child Marriage Mother and Husband Booked in Akalkuwa Nandurbar | प्रसूतीसाठी दवाखान्यात आली अन् बालविवाहाचं बिंग फुटलं! आई आणि पतीवर गुन्हा दाखल

प्रसूतीसाठी दवाखान्यात आली अन् बालविवाहाचं बिंग फुटलं! आई आणि पतीवर गुन्हा दाखल

Nandurbar Crime: अल्पवयीन मुलीचे लग्न केल्याचे बिंग तिच्या प्रसूतीच्या वेळी फुटल्याचा प्रकार घडला. याबाबत करमाळा येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर तो अक्कलकुवा पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीची आई व पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा गेल्यावर्षी अर्थात मार्च २०२४ मध्ये तालुक्यातीलच एका युवकाशी विवाह लावून देण्यात आला होता. मुलगी त्यावेळी १४ वर्षांची होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आईने तिचे लग्न लावून दिले तर युवकाने पत्नी म्हणून तिला स्वीकारले.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात झाला होता मुलीचा विवाह

अल्पवयीन मुलीच्या विवाहाची घटना मार्च २०२४ मध्ये अक्कलकुवा पोलिस ठाणे हद्दीत घडल्याने तो गुन्हा अक्कलकुवा येथे वर्ग करण्यात आला. त्यानंतर अक्कलकुवा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्यानुसार मुलीची आई आणि तिचा पती यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक धीरजसिंग वसावे करीत आहेत.

थेट पोलिसांना कळविले... 

मुलीचा जबाब घेऊन सरकार पक्षातर्फे सहायक पोलिस निरिक्षक गिरिजा मस्के करमाळा पोलिस ठाण्यात प्राथमिक गुन्हा दाखल केला. प्रसुतीसाठी आलेली महिला ही अल्पवयीन असल्याचे समजताच करमाळा येथील डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता थेट पोलिसांना याबाबत माहिती दिली.

करमाळा पोलिसात दाखल झाली होती फिर्याद

मुलीचा जबाब घेऊन सरकार पक्षातर्फे सहायक पोलिस निरिक्षक गिरिजा मस्के करमाळा पोलिस ठाण्यात प्राथमिक गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीच्या विवाहाची घटना अक्कलकुवा पोलिस ठाणे हद्दीत घडल्याने तो गुन्हा अक्कलकुवा येथे वर्ग करण्यात आला.

त्यानुसार मुलीची आई आणि तिचा पती यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक धीरजसिंग वसावे करीत आहेत. लवकरच याबाबत चौकशी करण्यात येऊन कायदेशीर बाबींची प्रक्रिया केली जाणार आहे.
 

Web Title: Delivery at Hospital Exposes Child Marriage Mother and Husband Booked in Akalkuwa Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.