तळोदा येथील जळीत तरुणीची मृत्यूशी झुंज

By Admin | Updated: May 20, 2017 18:09 IST2017-05-20T18:09:44+5:302017-05-20T18:09:44+5:30

रुग्णालयातील असुविधेचाही तिला सामना करावा लागत आहे.

The death of the young girl of Taloda is alive | तळोदा येथील जळीत तरुणीची मृत्यूशी झुंज

तळोदा येथील जळीत तरुणीची मृत्यूशी झुंज

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 20 - तळोदा शहरातील विद्यानगरी भागात 16 मे रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान युवतीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिल्याचा प्रकार घडला होता़ यातील तरुणीची मृत्यूशी झुंज देत असून रुग्णालयातील असुविधेचाही तिला सामना करावा लागत आहे.
आपुलकीने आणि नातेसंबंधातून बोलण्याला प्रेम समजून 22 वर्षीय युवकाने युवतीला पेटवून दिले होत़े 60 टक्के भाजलेली ती 18 वर्षीय युवती सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यूसोबत झुंज देत असून, तिला जाळणारे अद्यापही फरार आहेत़
60 टक्क्यांच्यावर भाजलेल्या 18 वर्षीय पिडीतेला सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर 104 क्रमांकाची खोली तिला देण्यात आली आह़े जळीतांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसलेल्या या खोलीत तिच्या शरीरावरच्या जखमांची अक्षरश: हेळसांड होत आह़े ड्रेसिंग करण्यासाठी कोणीही कर्मचारी तिकडे फिरकत नसल्याने आई, मावशी, वडील भाऊ हेच तिच्यावर ड्रेसिंग करून तिला जगवण्याचा प्रयत्न करत आह़े उघडय़ा खिडक्यांमधून येणा:या सूर्यकिरणांमुळे क्षणाक्षणाला जळणा:या जखमा तपासण्यासाठी दिवसातून एखादा डॉक्टर येत असल्याने अखेर तिच्या कुटुंबीयांनी तिला नंदुरबार शहरातील खाजगी रूग्णालयात हलवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. यासाठी त्यांनी  कजर्ही घेतले आह़े सामान्यांसाठी असलेल्या सामान्य रूग्णालयात पीडितेची प्रकृती सामान्य होणार नसल्याचे ते सांगतात़

Web Title: The death of the young girl of Taloda is alive