शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मृत्यूसंख्येसह मृत्यूदरातही झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या मृत्यूची संख्या ५२ झाली आहे. यामुळे मृत्यूदरही ४.८५ पर्यंत पोहचला आहे. दरम्यान, ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या मृत्यूची संख्या ५२ झाली आहे. यामुळे मृत्यूदरही ४.८५ पर्यंत पोहचला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन होऊनही चाचणी अहवालांची वेटींग तब्बल ७०० पर्यंत आहे. त्यामुळे संशयीत अनेकांची घालमेल कायम आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधीत आ िमृत्यूची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. दिवसेदिवस आकडा वाढतच चालला आहे. मृतांची संख्या देखील वाढत आहे. रविवारी १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकुण ५२ मृत्यूपैकी सर्वाधिक ३० मृत्यू हे नंदुरबार तालुक्यातील आहेत. त्यामुळे शहर आणि तालुक्यात चिंतेचे सावट पसरले आहे.
मृत्यूदर वाढतोय...
वाढत्या मृत्यूसंख्येमुळे जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदरही वाढत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत चार च्या घरात असलेला मृत्यूदर आता पाचच्या घरात गेला आहे. सद्यस्थितीत हा दर ४.८५ पर्यंत गेला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे नंदुरबार शहर व तालुक्यात आहेत. आतापर्यंत ३०जणांच्या मृत्यूची नोंद नंदुरबारात झाली आहे. याशिवाय शहादा तालुक्यात १६जणांचा मृत्यू झाला आहे. तळोदा व नवापूर तालुक्यातील प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला आहे.
वृद्धांची संख्या अधीक
मृत्यू झालेल्यांमध्ये वद्धांची संख्या सर्वाधिक आहे. ५२ पैकी ३६ जण हे ६० पेक्षा अधीक वयाचे आहेत. १४ जण हे ४० ते ६०वर्ष वयाच्या दरम्यानचे आहेत. तर दोनजण हे ४० पेक्षा कमी वयाचे आहेत. याचा अर्थ वद्धांच्या मृत्यूदर हा अधीक आहे. जे वद्ध मृत्यू झाले आहेत त्यांना इतर व्याधींनीही ग्रासले होते असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणने आहे.
त्यामुळे व्याधीग्रस्त वद्धांना घराबाहेर निघू न देणे, प्रवासाला न नेणे हाच प्रमुख उपाय असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
बाधीतांची संख्या वाढतेय
जिल्ह्यात बाधीतांची संख्या देखील वाढत आहे. अतापर्यंत ११०० च्या घरात आकडा गेला आहे. अजूनही तब्बल ७०० अहवालांची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे बाधीतांचा आकडा आणखी मोठ्या संख्येने वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.


नंदुरबारात आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या ठिकाणी अजूनही स्वॅब तपासणीची गती अतीशय संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. या प्रयोगशाळेत एका दिवसात १२०० स्वॅब तपासणीची क्षमता आहे. परंतु तरीही गेल्या दोन दिवसात स्वॅब वेटींगची संख्या ही ७०० पार राहत आहे. याचा अर्थ अद्यापही धुळे प्रयोगशाळेवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे. वेटींग वाढत असल्याने स्वॅब दिलेल्या अनेकांचे जीव टांगणीला आहेत. ज्या संशयीतांचा मृत्यू झाला आहे त्या संशयीतांचे अहवालही आलेले नाहीत. काहीजण तर स्वॅब देण्याच्या वेळ त्यांची प्रकृती खालावलेली होती, परंतु स्वॅब दिल्यानंतर पाच दिवसातही अहवाल न येताच त्यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना पुन्हा दहा दिवस रुग्णालयात काढावे लागणार आहेत.