शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात वराहांच्या मृत्यूचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 14:58 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  गेल्या आठ, १० दिवसांपासून शहरातील सर्वच भागात वराहांचा रोजच अचानक मृत्यू होत असल्याच्या ...

  लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  गेल्या आठ, १० दिवसांपासून शहरातील सर्वच भागात वराहांचा रोजच अचानक मृत्यू होत असल्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. तीन दिवसांपूर्वी म्हणजे एकाच दिवशी तब्बल ४० मेलेले वराह पालिका सफाई कामगारांनी उचलल्याचेदेखील सांगितले जात आहे. वराह मृत्यूच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पालिका व पशुसंवर्धन विभागाने ठोस प्रयत्न  करावे, अशी नागरिकांची मागणी  आहे. तळोदा शहरात वराहांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे वराह सर्वच भागात मोकाट फिरत असतात. साहजिकच त्यांचा उपद्रवामुळे शहरातील रहिवाशी अतिशय त्रस्त झाले आहे. त्यांच्या बंदोबस्ताबाबत सातत्याने मागणी होवूनही ठोस अशी कार्यवाही होत नाही. त्यामुळे वराहांची संख्या वाढत आहे. आता तर गेल्या आठ दिवसांपासून शहरातील सर्वच भागात अचानक चालता, चालता हे वराह खाली पडतात. आणि झोपेत मारतात, असे नागरीक सांगतात. त्यांचा अशा अचानक मृत्यूमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. एवढेच नव्हे त्यांचा दुर्गंधीमुळे अक्षरशः हैराण झाले आहे. जो पावेतो पालिका कर्मचारी येत नाही तो पावेतो रहिवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत असते. या मेलेल्या वराहांचे मोकाट कुत्रे लचके तोडून इतरत्र फेकत असतात.पालिका सफाई कर्मचारी मेलेले वराह उचलून, उचलून अक्षरशः हैराण झाल्याचे कामगार सांगतात. एकाच दिवशी तब्बल ४० मेलेले वराह उचलल्याचे सांगण्यात आले.            वास्तविक एवढ्या मोठ्या संख्येने रोज वराह मरत असताना त्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस प्रयत्न केले जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वराहांचा अशा अचानक मृत्यूच्या कारणाबाबत येथील पशु वैद्यकीय अधिकारींना विचारले                  असता सद्या वातावरणातील बदलांमुळे ताप, न्युमोनिया अथवा भुखमारीमुळे वराहांचा मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. आधीच कोरोनाच्या लाटमुळे नागरिकांमध्ये अजूनही दहशत आहे. त्यात               वरहांच्या मृत्यूचा घटनेने भर टाकली आहे. वराहांचा वाढता उपद्रवाबाबत पालिकेने ठोस कार्यवाही हाती            घ्यावी अशी नागरिकांची मागणी       आहे.