शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बोरद शिवारात आढळला  मृत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार :  तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास केळीच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार :  तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास केळीच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. या प्रकारामुळे बिबट्याच्या संचारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा वनक्षेत्रातील बोरद परिमंडळात बोरद शिवारात समाविष्ट असलेल्या जुल्फीकार गुलाब तेली रा.बोरद यांच्या शेतात मंगळवारी  शेतमालक व मजुरांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी वनविभागाला कळवली. त्यानंतर मेवासी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक आर.एस. कापसे, वनक्षेत्रपाल नीलेश रोडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नवले व रेंज टॉप तातडीने घटनास्थळी हजर झालेत. वनक्षेत्रपाल यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत बिबट मादी असून अंदाजे वय १० ते १२ वर्षे वय असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत बिबट तीन ते पाच दिवसांपूर्वी मृत झालेला असावा, त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा अथवा खुणा आढळल्या नाहीत. शरीर कुजल्यामुळे  दुर्गंधी येत होती. वृद्धापकाळाने अथवा अन्न न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी बिबट्याच्या शरीरातील विविध अवयवांच्या व्हिसेरा काढला आहे. व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.दरम्यान, या भागात बिबट्यासह इतर हिंस्त्र प्राण्यांचेही मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. शेतकरी व मजुरांना ते वारंवार दिसूनही येतात. त्यामुळे परिसरात शेतमजूर कामावर येण्यास तयार होत नाहीत. शेतपिकांची वेळेवर मशागत होत नसल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊन शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे वनविभागाने मोहीम राबवून या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.