शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

आत्याचा पाया न पडल्याने मुलगी व पत्नीला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  घरी आलेल्या आत्याच्या पाया पडली नाही या कारणावरून स्वतःच्या मुलीला व पत्नीला मारहाण करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  घरी आलेल्या आत्याच्या पाया पडली नाही या कारणावरून स्वतःच्या मुलीला व पत्नीला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने एक दिवस पोलिस कोठडी दिली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील दशरथ नगर भागात राहणारे दादाभाई तुकाराम पिंपळे यांची बहिण उषाबाई ही त्यांच्या राहत्या घरी आली असताना दादाभाई ने त्यांची मुलगी कु.आशा हिला तिची आत्या उषाबाई यांचा पाया पडायला सांगितले. त्यास आशा ने नकार दिला. याचा राग येऊन रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास स्टीलच्या उलथनीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. यावेळी पत्नी भामिनी या मध्यस्थी करायला गेल्या असता त्यांनाही गळा दाबत डोके  किचन ओट्यावर आपटून दुखापत केली. त्याप्रमाणे लग्न झाल्यापासून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत शहादा पोलिसात भामिनी दादाभाई पिंपळे यांच्या फिर्यादीवरून दादाभाई तुकाराम पिंपळे, रा. दशरत नगर, फॉरेस्ट ऑफिस समोर, शहादा  व उषाबाई तुकाराम पिंपळे रा.सिध्दार्थ नगर, शिंदखेडा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील करीत आहेत.