लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर, लहान शहादे, सुजालपूर, विखरण, कोळदे, पळाशी, शिंदे, खोडसगाव, बामडोद, खोंडामळी या परिसरात अतिवृष्टीमुळे कापूस व मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरांचीही मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. समशेरपूर येथे विहिरीचेही नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}