शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले ...

गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा दुष्काळी परिस्थितीवर मात करीत ब्राह्मणपुरी, ता. शहादा येथील शेतकऱ्यांनी केळी लागवड करून आजपर्यंत मोठ्या कष्टाने हे पीक जोपासले आहे. यावर्षी केळीला चांगल्याप्रकारे भाव मिळेल या आशेने वर्षभर केलेल्या कष्टाचे फळ समोर दिसत असताना १६ व १७ मे रोजी दुपारी अचानक वादळाने थैमान घातले. यामध्ये हातातोंडाशी आलेले केळीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे.

आधी भाव कमी, आता अस्मानी संकटाने घेरले

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केळी पिकाची लागवड केली होती. केळीला भाव चांगला मिळेल या आशेने शेतकरी वर्ग आनंदात होते. परंतु, व्यापाऱ्यांकडून लॉकडाऊनचे कारण दाखवत अडवणूक करून कमी भावात मागणी करण्यात येत होती. त्यातच आता वादळी वाऱ्याने केळीचे पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

वादळी वाऱ्याने वीज खांब वाकले

ब्राह्मणपुरी परिसरात झालेल्या वादळामुळे ब्राह्मणपुरी गावठाणच्या विद्युत खांबांवर झाडे उन्मळून पडल्याने विद्युत खांब वाकून वीजपुरवठा खंडित झाला होता. याठिकाणी ब्राह्मणपुरी गावाचे लाईनमन सुनील शिरसाठ, दादाभाई गिरासे, रवींद्र भोसले, अक्षय पवार, आदी कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत केला.