शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाऱ्याला भररस्त्यात थांबवून ग्राहकाने केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विसरवाडी ता़ नवापुर येथे बँकेत नोटा सॉर्टिंग करुन आणण्याचे सांगितल्याचा राग आल्याने ग्राहकाने कॅशिरयला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ता़ नवापुर येथे बँकेत नोटा सॉर्टिंग करुन आणण्याचे सांगितल्याचा राग आल्याने ग्राहकाने कॅशिरयला भर रस्त्यात थांबवून मारहाण केली़ शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या घटनेप्रकरणी संबंधित बँक ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़विसरवाडी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कार्यरत असलेले मुकेशकुमार शालिग्राम सिंग रा़ विसरवाडी हे शुक्रवारी कॅश काउंटरवर असताना त्याठिकाणी दिलवर नाग्या पाडवी रा़ केवडीपाडा ता़ नवापुर हा आला़ दिलवर पाडवी याने १०० रुपयांच्या नोटांचे बंडल कॅशियर सिंग यांच्याकडे दिले़ यावेळी सिंग यांनी नव्या आणि जुन्या नोटांचे सॉर्टिंग करुन द्या, अशी सूचना केली़ याचा राग आल्याने दिलवर पाडवी याने दमदाटी करत आरडाओरड केली़ दरम्यान इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दिलवर हा तेथून निघून गेला होता़ सायंकाळी बँक बंद झाल्यानंतर कॅशियर मुकेशकुमार सिंग हे विसरवाडी गावातील डॉ़ आबीद यांच्या दवाखान्यासमोरुन घराकडे जात असताना दिलवर पाडवी याने त्यांना रस्त्यात थांबवून मारहाण करत शिवीगाळ केली़शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर बँक प्रशासनासोबत चर्चा करुन मुकेशकुमार यांनी शनिवारी सायंकाळी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित दिलवर पाडवी याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत़