शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात प्लॅस्टिक खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST

राकसवाडे चाैफुलीवर उपाययोजनांची गरज नंदुरबार : वाका ते नंदुरबारदरम्यान राकसवाडे चाैफुलीवर उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी ...

राकसवाडे चाैफुलीवर उपाययोजनांची गरज

नंदुरबार : वाका ते नंदुरबारदरम्यान राकसवाडे चाैफुलीवर उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी भीषण अपघात घडला होता. यानंतरही येथे गतिरोधक किंवा इतर उपाययोजना करण्याबाबत उदासीनता आहे.

नागरिकांना वनमहोत्सवाची प्रतीक्षा

नंदुरबार : जिल्ह्यात वृक्षलागवडीची चळवळ यंदाही सुरू ठेवण्याचा पर्यावरणवादी नागरिकांचा मानस असून, वनविभागाने सालाबादाप्रमाणे यंदाही वनमहोत्सवाचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत नागरिकांना मोफत वृक्षांचे वाटप करण्यात येते. गेल्या काही काळात वृक्षलागवडीबाबत जागरूकता वाढत असून, झाडे जगण्याची टक्केवारीही वाढत आहे.

बसफेऱ्या वाढविण्याची मागणी कायम

धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव शहर व तालुक्यातील मोठ्या गावांसाठी नंदुरबार व शहादा आगारातून बसेस सुरू व्हाव्यात, अशी मागणी आहे. कोरोनानंतर या तालुक्यात बसफेऱ्या सुरू झाल्या नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

पूर्वभागात दमदार पावसाची प्रतीक्षा

शनिमांडळ : तालुक्याच्या पूर्वभागातील शनिमांडळ परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. या भागात पेरणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. परंतु दमदार असा पाऊस येऊन जमिनीची वाफ झालेली नसल्याने शेतकरी पेरण्यांसाठी थांबले आहेत.

दुर्गम भागात मास्क वापराबाबत जागृती

धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात मास्क वापराबाबत जागृती होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांकडून बाजारपेठेत येताना मास्क किंवा तत्सम कापड तोंडावर बांधले जात असल्याचे दिसून येत आहे. धडगाव तालुका हा कोरोनामुक्त तालुका म्हणून घोषित आहे. असे असले तरीही नागरिकांकडून पूर्णपणे उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात येत आहे.

जलनमुने तपासावेत

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींतर्गत जलनमुने तपासून त्यांचा अहवाल देण्याची अपेक्षा आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व ग्रामपंचायतींचे पिण्यायोग्य पाण्याची तपासणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात जलजन्य आजारांची सर्वाधिक भीती असते.

रोजगार मिळाला

नंदुरबार : शेतकामांना सुरुवात झाल्याने ग्रामीण व शहरी भागातील शेतीपूरक उद्योगांनाही चालना मिळत आहे. यात नांगर व इतर शेतीसाहित्य तयार करणारे कारागीर, फवारणी पंप दुरुस्त करणारे कारागीर तसेच ट्रॅक्टरचालकांना रोजगार मिळत असल्याचे दिसून आले आहे. मजुरांनाही रोजगार मिळत आहे.

ग्रामीण भागात साफसफाईची गरज

नंदुरबार : जिल्ह्यात पावसाळ्यात गटारी व सांडपाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याने रोगराईची भीती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी त्या त्या गावांमधून करण्यात आली आहे.

करण चाैफुलीवर पुन्हा वाढले खड्डे

नंदुरबार : शहरातील करण चाैफुलीवर पुन्हा खड्डे पडले आहेत. हे खड्डे पावसाळ्यात अधिक धोकेदायक व अपघाती ठरण्याची शक्यता आहे. प्रशासनाने खड्डे बुजवून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.