शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार कोटींचा पतपुरवठा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 11:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  ग्रामीण भागातील नागरिकांचे बँक खाते आधारशी जोडण्यासाठी आणि प्रलंबित अर्जावर कार्यवाही करण्यासाठी सुटीच्या दिवशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  ग्रामीण भागातील नागरिकांचे बँक खाते आधारशी जोडण्यासाठी आणि प्रलंबित अर्जावर कार्यवाही करण्यासाठी सुटीच्या दिवशी विशेष मोहिम राबवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केली. दरम्यान, १६८५ कोटी ७३ लाख  रुपयांचा पत आराखडा मंजुर करण्यात आला.                जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, विभागीय महाव्यवस्थापक डॉ.अजित मराठे, राकेश कुमार, लिड बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबार्डचे प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, धडगाव आणि तोरणमाळ येथे लवकरच विद्युत वाहिनी व उपकेंद्राचे काम होणार असल्याने इंटरनेटच्या समस्या दूर होतील. बँक अधिकाऱ्यांनी अधिकाधीक नागरिकांना बँक व्यवहाराच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा. गरजूंना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांच्याकडे बँक खाते आवश्यक असल्याने ग्रामीण भागातील विकास गतीमान करण्यात बँकेची महत्वाची भूमीका आहे. निती आयोगाने जिल्हाविकासाच्या विविध घटकांमध्ये झालेल्या प्रगतीबाबत कौतुक केले आहे, तसे बँकेच्या कामगिरीबाबतही प्रगती व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.                बैठकीत प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, जनधन योजना, मुद्रा योजना, पीक कर्ज वाटप यासह विविध योजनांसंदर्भात बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते २०२१-२२ साठीच्या जिल्हा पत आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. १६८५ कोटी ७३ लक्ष रुपयांचा आराखडा तयार केला आहे. गतवर्षी वितरीत केलेल्या २९१ कोटीच्या पीककर्जाच्या तुलनेत यावर्षी ३२४ कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रब्बीसाठी देखील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत उद्दीष्ट पूर्ण करावे, असे डॉ.भारुड यांनी सांगितले.

निती आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार...निती आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार योजनांचा पत पुरवठा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.                                    आश्वासीत जिल्हा असल्याने योजना राबवितांना जिल्ह्याने विविध घटकांमध्ये घेेतलेल्या आघाडीबाबत निती आयोगानेही समाधान व्यक्त केले.