कोविड योद्धे आरोग्य कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST2021-05-20T04:33:01+5:302021-05-20T04:33:01+5:30

गेल्या सोळा महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत आहेत. दिवस-रात्र सुमारे सोळा ते अठरा तास कामे करून ...

Covid warriors await pay to health workers | कोविड योद्धे आरोग्य कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

कोविड योद्धे आरोग्य कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

गेल्या सोळा महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत आहेत. दिवस-रात्र सुमारे सोळा ते अठरा तास कामे करून आरोग्य कर्मचारी कोरोनाशी दोन हात करून लढा देत आहेत. या काळात शासनाने इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येण्याची मुभा दिली तर दुसरीकडे आरोग्य कर्मचारी कोणतीही सुटी न घेता कार्यरत आहेत. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित होत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गृहकर्ज, विमा हप्ते, दैनंदिन खर्च भागविणे कठीण होत आहे. शासन ज्यांना कामावर बोलावत नाही त्यांचे वेतन नियमित होत आहेत. मात्र, दुसरीकडे दिवस-रात्र राबराब राबून कोविड कामे करणारे आरोग्य कर्मचारी मात्र वेतन लवकर द्या, अशी आर्त हाक मारत प्रशासनाला विनवण्या करत आहेत.

मार्च महिन्याचे वेतन तर २७ एप्रिला मिळाले. आता एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी २० मे तारीख उजाडली तरी अजूनही प्रतीक्षाच आहे. सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून विहित मुदत ठरवून दिली आहे. मात्र, कधीही या नियमांचे पालन होत नाही. वेतन विलंब होऊ नये यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढून वेतन दरमहा एक ते पाच तारखेच्या आत व्हावे यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Web Title: Covid warriors await pay to health workers