शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्धवस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाण्याविहीर, ता.अक्कलकुवा येथे बनावट देशी दारू बनविण्याचा कारखानावर स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने धाड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाण्याविहीर, ता.अक्कलकुवा येथे बनावट देशी दारू बनविण्याचा कारखानावर स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने धाड टाकून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. एकास अटक करण्यात आली असून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन प्रकाश यादव (३२) रा.वाण्याविहिर, ता.अक्कलकुवा असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. वाण्याविहिर येथे बनावट दारू बनविली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला मिळाली होती. पथक गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पाळत ठेवून होते. शुक्रवार १४ रोजी रात्री आठ वाजता अंधारात ही कारवाई करण्यात आली. वाण्याविहिर येथील संशयीताच्या घराच्या आजूबाजुला साध्या वेशातील पथकातील सदस्यांनी घेरले. पडक्या जागेवरील झोपडीत काचेच्या बाटल्यांचा आवाज आल्यावर खात्री झाल्यानंतर धाड टाकण्यात आली. यावेळी चाहूल लागताच संशयीत सचिन प्रकाश यादव याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने त्यास जेरबंद केले.या ठिकाणाहून ३९ हजार ९३६ रुपयांची बनावट देशी टँगोपंच दारूच्या ७६८ बाटल्या.६० हजार रुपये किंमतीचे दारू बनविण्यासाठी लागणारे स्पिरीट, ३३,५०० रुपये किंमतीची १०० लिटर बनावट देशी दारू, १० हजार रुपये किंमतीचे बाटल्या सिलबंद करण्यासाठी लागणारे मशीन, एक हजार रुपये किंमतीचे अल्कहोल मोजण्याचे मशीन व चार हजार २०० रुपयांचे बूच, लेबल व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सचिन यादव याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार मुकेश तावडे, सुनील पाडवी, युवराज चव्हाण, जितेंद्र ठाकुर यांच्या पथकाने केली.