शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

कापूस पिकाची झाडे उपटून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : धुरखेडा, ता.शहादा येथील शेतकऱ्यांच्या प्रकाशा शिवारातील शेतात कापूस पिकाची सुमारे ५०० झाडे अज्ञात लोकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : धुरखेडा, ता.शहादा येथील शेतकऱ्यांच्या प्रकाशा शिवारातील शेतात कापूस पिकाची सुमारे ५०० झाडे अज्ञात लोकांनी उखडून फेकल्याची घटना घडली. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महिनाभरातील ही दुसरी घटना असून पोलिसांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही, अशी संतप्त प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केली.
शेतकºयांनी महागडे बी-बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरीचा खर्च करुन कापसाच्या पिकाचे संगोपन केले. मात्र अज्ञात समाजकंटकांकडून पिकांचे नुकसान होत असून शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. २८ जुलै रोजीही पिकांचे नुकसान झाल्याने पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र ‘पोलीस सुस्त व समाजकंटक मस्त’ अशी संतप्त प्रतिक्रीया धुरखेडा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
धुरखेडा येथील अंबालाल गोरख पाटील यांच्या प्रकाशा शिवारातील शेतात कापूस लागवड केली आहे. सोमवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी या शेतातील ५०० ते ६०० कापसाची झाडे उपटून फेकून दिली आहेत.
गेल्याच महिन्यात याच शिवारात तुकाराम श्रीपत पाटील, खंडू गिरधर पाटील यांच्या एक एकर क्षेत्रातील कापूस पीक उपटून फेकण्यात आले होते. त्याची लेखी तक्रार पोलिसांत देऊन अज्ञात लोकांविरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्या घटनेतील आरोपींचा अद्यापही शोध लागलेला नाही.
शेतकºयांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाºयांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाइ करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. याबाबत धुरखेडा येथील सर्व शेतकरी शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.

वारंवारच्या या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
समाजकंटकांना ठोस शिक्षा झाल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. त्यासाठी पोलिसांनी आणि प्रशासनानेही थेट कारवाईसाठी पुढे येणे गरजेचे आहे. शेतकºयांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहचविणे देखील आवश्यक आहे.