शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक पूत्राच्या लग्नाच्या जेवनावळीला चढला राजकीय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाची मेजवानी सध्या नंदुरबारात फारच गाजत आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाची मेजवानी सध्या नंदुरबारात फारच गाजत आहे. या मेजवानीत जेवना तयार करणाऱ्या खानसामालाच कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. मेजवानीत उपस्थित राजकीय पदाधिकारी, अधिकारी यांचे यामुळे धाबे दणाणले आहे. प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे. तर आयोजकांनी खानसामा सुरत येथून मागविलेला होता. पॉझिटिव्ह व्यक्ती जेवनावळीत आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नंदुरबारातील नगरसेवकाच्या मुलाच्या जेवनावळीचा मुद्दा जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे. या नगरसेवकाचे नातेवाईक असलेले खानसामा हे शहरात प्रसिद्ध आहेत. अनेक नेते, राजकीय पदाधिकारी यांच्या जेवनावळीसाठ त्यांनाच पाचारण केले जाते. या जेवनावळीसाठी देखील तेच खानसामा होते असे बोलले जात आहे. नेमके तेच खानसामा मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेला आता राजकीय रंग दिला जात असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी थेट माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.मंगळवारी संबधीत खानसामा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या जेवनावळीची जोड देत अनेकांनी सोशल मिडियावर एकच चर्चा सुरू केली. या जेवनावळीत कोण अधिकारी होते, कोण राजकीय नेते व पदाधिकारी होते याची चर्चा रंगली आहे. लॉकडाऊनच्या निर्देशांचे भंग करीत ही जेवनावळ दिली गेली आणि त्यात उपस्थितांच्या संख्येचीही मर्यादा भंग केला गेल्याचा आरोप होत आहे. ज्या ठिकाणी ही जेवनावळ झाली ते फार्म हाऊस एका राजकीय नेत्याचे आहे. त्यामुळे त्याला अधीकच वलय निर्माण झाले आहे.मनसेकडून चौकशीची मागणीयाबाबत मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निवेदन दिले आहे. एकीकडे लॉकडाऊन, संचारबंदीचे नियम तोडल्यास सर्वसामान्यांवर थेट गुन्हे दाखल होऊन दंड वसूल केला जात आहे. दुसरीकडे राजकीय नेत्यांनी आपले वजन वापरून नियमभंग केल्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हा दुजाभाव आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना रोखण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत. दुसरीकडे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरविले जात असल्याचे या निवेदनात जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उपजिल्हाध्यक्ष ईश्वर ठाकुर , सचिव पवन गवळे म्हटले आहे.परवाणगी घेवूनच कार्यक्रममुलाच्या लग्नाची जेवनावळ ही नियमानुसार परवाणगी घेवूनच आयोजित करण्यात आली. शिवाय येथे जेवन तयार करणारा खानसामा हा सुरत येथून आलेला होता. कोरोना पॉझिटिव्ह खानसामा त्या दिवशी उपस्थित नव्हता असा दावा आयोजक तथा नगरसेवक खान परवेज करामतभाई यांनी केला आहे.याबाबत त्यांनी पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. मुलाचे लग्न घरगुती स्वरूपात झाले. त्यानंतर ७ जून रोजी झराळी येथे स्रेह भोजन ठेवले. त्यासाठी ४ जून रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून रितसर परवाणगी घेण्यात आली. या ठिकाणी जो खानसामा बोलविण्यात आला होता तो सुरत येथील होता. पॉझिटिव्ह रुग्ण असलेला खानसामा हा आमचा नातेवाईक असला तरी त्यांच्याशी १ जूनपासून संपर्क नव्हता. त्यांना हृद्ययाचा त्रास असल्याने ते उपचारासाठी गेलेले होते. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह खानसामा जेवनावळी तयार करण्यासाठी होता हा आरोप निराधार आहे. कार्यक्रमात ५० लोकांपेक्षा अधीक जण नव्हतेच. कुठल्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. कुठल्याही चौकशीस आपण तयार असल्याचेही या पत्रकात खान परवेज करामतभाई यांनी म्हटले आहे.