शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण जगतोय सर्वसामान्य जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:41 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एप्रिल महिन्यात जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण समोर आला होता. त्याच्यासोबत कुटूंबातील तिघांनाही कोरोनाची ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एप्रिल महिन्यात जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण समोर आला होता. त्याच्यासोबत कुटूंबातील तिघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. तब्बल २४ दिवस उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मे महिन्यात घरी गेलेला हा रुग्ण आणि त्याचे कुटूंब आजघडीस सर्वसामान्य जीवन जगत असून या काळात रुग्णालय प्रशासनाने केलेल्या योग्य उपचारांमुळे आपण कोरोनातून बाहेर आल्याचे ते सांगत आहेत. जिल्ह्यात आजघडीस कोरोना संसर्ग झालेले एकूण ६ हजार ८०० रुग्ण समोर आले आहेत. यातील ६ हजार २३३ जण कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात आज रुग्णांची संख्या मोठी असली तरी एप्रिलपूर्वी एकही रुग्ण जिल्ह्यात  नव्हता. १८ एप्रिल रोजी प्रथम कोरोनाबाधित नंदुरबार शहरात आढळून आला होता. बाधिताच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाला  होता. संबधित रुग्णासोबत त्याच्या कुटूंबातील आई, मुलगा व मुलगी असे तिघेही बाधित असल्याचे समोर आल्यानंतर चाैघांना जिल्हा रुग्णालयात उपचार देण्यात आले. उपचाराच्या आठ महिन्यानंतर हे सर्व आज सामान्य जीवन जगत असून दैनंदिन कामे उत्साहाने करत आहेत. कोरोनापासून केवळ  स्वत:ची काळजी हा एकमेव गुण वाचवू शकतो असे ते आता सर्वांना सांगत आहेत. पहिला रूग्ण कसा ट्रेस झाला? उपचार कसे झालेनंदुरबार शहरातील दाट लोकवस्तीत राहणारे ५५ वर्षीय व्यक्ती छातीतील कफ आणि खोकल्याची समस्या असल्याने एका खाजगी रुग्णालयात गेले होते. याठिकाणी उपचार घेत असताना लक्षणे कोरोनासमान असल्याने संबधित डाॅक्टरांनी जिल्हा रुग्णालयात कळवून देत संबधिताला रुग्णालयात भरती केले होते. याठिकाणी कोरोना चाचणीनंतर बाधिताला संसर्ग झाल्याचे समोर आले होते. कुटुंबात कोणी पॉझिटिव्ह आढळले कोणी आढळले बाधित रुग्णासोबतच त्याची आई, मुलगी आणि मुलगा असे तिघे बाधित असल्याचे समोर आले होते. हे तिघेही आज सामान्य जीवन जगत आहेत. मुलगा कोरोनातून बरा झाल्यावर बीएस्सीच्या अभ्यासक्रमात व्यस्त आहे. मुलगी एसएससीची उत्तीर्ण झाली आहे. तर ७३ वर्षीय आई सामान्य जीवनमान जगत आहे. आठ महिन्यांनी त्या कुटूुंबियांना भेटण्यासाठी बाहेरगावी गेल्याची माहिती देण्यात आली आहे.