शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने शिकविला बचतीचा मार्ग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्च कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST

ब्राह्मणपुरी : कोरोनाच्या संसर्गाने नागरिक त्रस्त झाले असले, तरी या काळात निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईने नागरिकांना खूप काही शिकविले ...

ब्राह्मणपुरी : कोरोनाच्या संसर्गाने नागरिक त्रस्त झाले असले, तरी या काळात निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईने नागरिकांना खूप काही शिकविले आहे. त्यातूनच पूर्वीच्या तुलनेत होणारे घर खर्च निम्म्यावर आले आहेत.

कोरोना काळात शासनस्तरावर लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे बाजारपेठेतील सर्वच दुकाने अनेक दिवस बंद राहिली. यामुळे व्यावसायिक, उद्योजक अडचणीत सापडल्याने त्यांच्याकडे काम करीत असलेल्या अनेकांच्या नोकऱ्यांवर समस्या आली. विशेषत: खासगी क्षेत्रात कार्यरत अनेक कर्मचाऱ्यांचे पगार कमी झाले. बाजारपेठेत छोटी दुकाने थाटणाऱ्यांवर तसेच रिक्षाचालकांवरही आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे अनेकांनी काटकसरीचा पर्याय स्वीकारला असून, प्रत्येक घरात किचनपासून कटिंगपर्यंत कॉस्टकटिंग सुरू झाले आहे.

कुठे कुठे केली कॉस्टकटिंग

शाळा नसल्याने मुलांवरील खर्चही कमी होत आहे.

लागतील तेवढ्याच भाज्या खरेदी केल्या जात आहेत. त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी भाजीपाला व्यवसायाबरोबर घरीच केक बनविला जात आहे.

घरात कंटाळा आला म्हणून आणण्यात येणारे पार्सल बंद होऊन घरातच स्वयंपाक केला जात आहे.

ब्यूटी पार्लरमधील वेगवेगळे मेकअप करण्यावर महिलांचे हजारो रुपये खर्च होत होते. कोरोनाकाळात ब्यूटी पार्लर बंद होते. कार्यक्रमही बंद होते. त्यामुळे महागडा मेकअप लावण्याची गरज राहिली नसल्याने यातून बराच खर्च वाचला आहे. पुरुष वर्गानेही चेहऱ्याचा मसाज बंद केला. सेव्हिंगही घरीच उरकली जात आहे.

तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अनेक गृहिणींनी आपल्या दैनंदिन स्वयंपाकात तेलाचा वापर कमी करण्याचे धोरण राबविले. तसेच विजेची बचत करण्यासाठी अनावश्यक विजेचा वापर टाळला.

कपडे, लग्न समारंभ, फिरणे टाळले

आम्ही कपडे, लग्न समारंभ, फिरणे टाळले असून, खर्चावर मर्यादा आणली आहे. कोरोना संकट काळापूर्वी दरवर्षी बाहेरगावी जाणे-येणे सुरू होते. परंतु कोरोना संकट काळापासून बाहेरगावी येणे-जाणे बंद केले आहे. - उजनबाई चिंधा राजपूत, ब्राह्मणपुरी, ता. शहादा

दैनंदिन खर्चात केली कपात

कोरोनामुळे उत्पन्न कमी झाले असतानाच दुसरीकडे महागाईने कळस गाठला आहे. यामुळे घरात लागणाऱ्या साहित्याच्या खर्चात कपात केली आहे. - शीतल कन्हैया मराठे, गृहिणी, ब्राह्मणपुरी

परिस्थिती काटकसरीने सावरत आहे

प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल केल्याने काही प्रमाणात रिक्षा व्यवसाय सुरू झाला आहे. मात्र, प्रवासी नेण्याची मुभा आणि रिक्षात बसण्यास लोकांच्या मनात असलेली भीती यांमुळे दिवसभर थांबूनही चार पैसे मिळताना मारामार होत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना कसरत होत आहे. यामुळे दैनंदिन खर्च काटकसरीने करीत आहे. - कामिनी विनोद पाटील, सुलतानपूर, ता. शहादा.

भाजीपाला घरीच लागवड करण्यात येत आहे

दाढी-कटिंग घरीच केली जात आहे

केक घरीच तयार करण्यात येत आहे.

नवीन कपडे तसेच समारंभाला जाणे टाळले जात आहे.

ब्युटी पार्लरमध्ये जाणे बंद.

किराणा, भाजीपाला, दैनंदिन खर्चावर मर्यादा आल्या आहेत.