तळोदा उपनगराध्यक्षांकडून कोरोना रुग्णांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:28+5:302021-04-09T04:32:28+5:30

कोरोना महामारीने दिवसागणिक उग्र स्वरूप धारण केले आहे. कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर खासगी दवाखान्यातील डाॅक्टरांकडून रेमडिसीवर इंजेक्शन आणण्याची सूचना ...

Corona patients help from Taloda Deputy Mayor | तळोदा उपनगराध्यक्षांकडून कोरोना रुग्णांना मदत

तळोदा उपनगराध्यक्षांकडून कोरोना रुग्णांना मदत

कोरोना महामारीने दिवसागणिक उग्र स्वरूप धारण केले आहे. कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर खासगी दवाखान्यातील डाॅक्टरांकडून रेमडिसीवर इंजेक्शन आणण्याची सूचना केली जात आहे; परंतु जिल्ह्यात या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. बाहेरील जिल्ह्यातून ते आणावे लागत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे गरीब रुग्ण बाहेरगावी जावू शकत नाही. दुर्लक्षित असलेल्या अशा रुग्णांसाठी येथील नगरपालिकेच्या उप नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याबाहेरून ७५० रेमडिसीवर इंजेक्शन आणून बुधवारी गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले आहे. इंजेक्शन मिळवून देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष योगेश चौधरी यांनी सहकार्य केले. इंजेक्शन वाटपासाठी नितीन गरुड, कांतीलाल चौधरी, प्रमोद चौधरी, कालू पिंजारी, किरण महाले परिश्रम घेत आहेत.

Web Title: Corona patients help from Taloda Deputy Mayor