व्यसनाच्या गरजा भागविण्यासाठी कोरोना रुग्णांचा गावात वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST2021-03-21T04:28:50+5:302021-03-21T04:28:50+5:30

शहादा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्याचे मोहिदा शिवारात शासकीय कोविड सेंटर आहे. त्याठिकाणी रुग्णांवर उपचार ...

Corona patients flock to the village to meet the needs of addicts | व्यसनाच्या गरजा भागविण्यासाठी कोरोना रुग्णांचा गावात वावर

व्यसनाच्या गरजा भागविण्यासाठी कोरोना रुग्णांचा गावात वावर

शहादा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्याचे मोहिदा शिवारात शासकीय कोविड सेंटर आहे. त्याठिकाणी रुग्णांवर उपचार केले जातात. सध्या या केंद्रात १३० रुग्ण आहेत. सध्या केंद्रात रुग्णसंख्या वाढली आहे. शासकीय कोविड सेंटर हे मोहिदा त.श. गावाच्या शिवारात असून, गावापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे तेथून अनेकांची ये-जा नियमित सुरू असते. सध्या रुग्णसंख्या वाढल्याने त्याठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. दाखल रुग्णांमधून काही व्यसनाधीन रुग्ण हे मोहिदा गावात असलेल्या विविध किराणा दुकान किंवा तत्सम पानटपऱ्यांवर जाऊन आपल्याला जडलेल्या व्यसनाची गरज भागवतात. दुकानदारही गावात कोणाकडे पाहुणे आले असेल म्हणून जास्त विचारपूस न करता संबंधिताला ती वस्तू लागलीच देतात. त्यामुळे गावात संसर्ग पसरण्याची भीती नाकारता येत नाही. यासाठी संबंधित कोविड सेंटरच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी सरपंच श्रद्धा पाटील यांनी केली आहे. निदान तेथून रुग्ण बाहेर पडणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.

कोविड सेंटरला दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी काही रुग्ण मोहिदा गावाच्या ठिकाणी असलेल्या दुकानात येऊन मालाची खरेदी करीत आहेत. संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सेंटरवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा.

-श्रद्धा पाटील, सरपंच, मोहिदे त.श., ता.शहादा

कोविड सेंटरला पोलीस बंदोबस्तासाठी प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले आहे. बंदोबस्त न मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी करण्यात येईल.

-डॉ.राजेंद्र वळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शहादा.

Web Title: Corona patients flock to the village to meet the needs of addicts