शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात पॉझिटिव्ह रुग्णांच्या मुक्तसंचाराने कोरोनाचे संक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST

कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते व लक्षणे नसलेल्या रुग्णांना पुढील काही दिवसांसाठी ...

कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते व लक्षणे नसलेल्या रुग्णांना पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले जाते. मात्र, शहरातील व ग्रामीण भागातील लक्षणे नसलेेले रुग्ण बेजबाबदारपणे अनेक ठिकाणी फिरताना आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन शिक्के हातावर मारण्यात येत होते. सध्या ही पद्धत बंद करण्यात आल्याने रुग्ण बेजबाबदारपणे वागत आहेत.

नवापूर शहरात रॅपिड टेस्टिंग व आरपीटीसीआर चाचणी मोहीम सुरू करण्यात आली असून, त्यात शहरातील अनेक नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांना नवापूर उपजिल्हा रुग्णालय व सीनिअर काॅलेजमधील वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. उपचारानंतर रुग्णांना सक्तीने होम क्वारंटाईन करण्यासंबंधीचे आदेश देण्यात येत असताना होम क्वारंटाईनच्या सक्तीला न जुमानता शहरात व ग्रामीण भागातील बाजारात, लग्न समारंभात मुक्त संचार करताना आढळून येत असल्याने चिंतेचा विषय ठरला असून, अशा रुग्णांमुळे अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. प्रशासनाकडून संचारबंदीची कडक अंबलबजावणी सक्तीने करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नवापूर शहरातील कोरोना हॉटस्पॉट भागात प्रशासनाने बॅरिकेड लावली आहे. तरीही काही रुग्ण बाहेर फिरताना आढळून येत असल्याने त्यांच्यामुळे अनेकांना धोका उद्भवू शकतो. याबाबत नगरपालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घराबाहेर सूचना पत्रक किंवा सांकेतिक चिन्हे लावणे गरजेचे आहे.

३१ मार्चला रेकॉर्डब्रेक रुग्ण आढळले

नवापूर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होत असून, आतापर्यंत सर्वाधिक १०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक ८५५ कोरोना रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोविड सेंटरमधील बेड फुल्ल असून, कोरोना संक्रमणाचा आलेख चिंताजनक आहे.

नवापूर शहरात नगरपालिका प्रशासन योग्य पद्धतीने कार्यवाही करत आहे. हाॅटस्पाॅट भागात बॅरिकेड्स व कोरोना तपासणी केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरत असल्याची माहिती नगरपालिकेला दिल्यास कारवाई करता येईल. याबाबत पालिका प्रशासन कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

-महेश चौधरी, मुख्याधिकारी, नगर पालिका, नवापूर