शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी बाधीत प्रकरणी संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा येथून बिहारमध्ये गेलेल्या १८ विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथून बिहारमध्ये गेलेल्या १८ विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांची अक्कलकुवा येथे तपासणी होऊन देखील अवघ्या दोनच दिवसात हे विद्यार्थी पॉझिटिव्ह कसे निघतात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.अक्कलकुवा येथे शिक्षण घेत असलेल्या बिहार मधील अडीच हजार विद्यार्थ्यांना ५ मे रोजी विशेष रेल्वेने सहरसा येथे पाठविण्यात आले होते. पाठविण्यापूर्वी या विद्यार्थ्यांची स्थानिक संस्था आणि प्रशासनातर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात एकाही विद्यार्थ्याला कुठलेही लक्षणे आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले. अक्कलकुवा येथून वाहनाने त्यांना नंदुरबार स्थानकापर्यंत आणण्यात आले. रेल्वे स्थानकात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांना रेल्वेत बसविण्यात आले.रेल्वे प्रशासनाने विद्यार्थी येण्याआधी, आल्यावर व रेल्वे गेल्यावर रेल्वेसह संपुर्ण परिसर वेळोवेळी सॅनिटाईज केला. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांना आसन देण्यात आले. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उपस्थितीत रेल्वे रवाना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सहरसा येथे रेल्वे पोहचल्यावर तेथे सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काहींचे स्वॅब घेण्यात आले. त्यात पहिल्या दिवशी तीन, नंतर प्रत्येकी सात व आठ अशा १८ विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.काही राष्टÑीय न्यूज चॅनेला बातम्या आल्या. त्यात नंदुरबारचे नाव स्पष्टपणे घेण्यात आले. परंतु येथील प्रशासनाने त्याबाबत काहीही स्पष्ट केले नाही. यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली असून तर्कवितर्कही लावले जात आहेत.या बाबतच्या बातम्या राष्टÑीय न्यूज चॅनेलने देखील दाखविल्या. तेथील जिल्हाधिकाºयांनी याबाबत माहितीही दिली आहे.संबधीत संस्थेने यापूर्वीच निवेदन देवून विद्यार्थ्यांची योग्य ती आरोग्य तपासणी केली गेल्याचे म्हटले आहे.