शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘गुणवत्तेची’ घसरण रोखण्यासाठी ठोस आराखडा हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

मनोज शेलार गेली वर्षभर ‘शाळा बंद व शिक्षण सुरू’ ही संकल्पना राबविली तरी जिल्ह्यातील दुर्गम भागात या संकल्पनेची ...

मनोज शेलार

गेली वर्षभर ‘शाळा बंद व शिक्षण सुरू’ ही संकल्पना राबविली तरी जिल्ह्यातील दुर्गम भागात या संकल्पनेची काय अवस्था होती हे सर्वच जण जाणतात. जिल्ह्यातील गुणवत्ता आधीच घसरलेली आहे. आता वर्षभरापासून शाळा बंद राहिल्याने त्यातील घसरण आणखी वाढली असेल यात शंकाच नाही. असर संस्थेने २०१७-१८ व २०१८-१९ या सलग दोन वर्षात केलेल्या जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात भागाकार, गुणाकार, वजाबाकी व वाचन या श्रेणीत जिल्हा राज्यात शेवटी व शेवटून दुसरा होता. आता सलग वर्षभर विद्यार्थी शाळेपासून दूर राहिले आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता किती आणि कशी टिकली असेल हा आता पुन्हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याचा निर्णय जो व्हायचा तो होईल परंतु किमान विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकविण्यासाठी तरी ठोस प्रयत्न झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिक्षणाचा दर्जा आणि एकूणच शिक्षणपद्धती याबाबत नेहमीच ओरड झाली आहे. तिला कारणही तसेच आहे. पूर्वी दऱ्याखोऱ्याच्या या भागात शाळा नियमित भरण्याबाबत नेहमीच तक्रारी होत्या. ‘शाळा सुरू पण शिक्षण बंद’ अशी परिस्थिती राहत होती. कालांतराने दुर्गम भागात दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या, शाळांच्या खोल्या, इमारती तयार झाल्या. गावातील युवक शिक्षित झाला. राजकारणात आलेली मंडळी व शिक्षित युवक यांना आपल्या हक्कांबाबत जाणीव झाली आणि धडगाव, अक्कलकुवासारख्या दुर्गम भागासह जिल्ह्यातील सर्वच भागात शिक्षणाविषयी चळवळ निर्माण झाली. परिणामी दुर्गम व ग्रामीण भागातील शाळा सुरू होऊ लागल्या. आताही परिस्थिती समाधानकारक आहे अशातला भाग नाही. परंतु किमान शिक्षक शाळेवर जाऊ लागले, शाळेची घंटा नियमित वाजू लागली हेही नसे थोडके.

गेल्या वर्षभरात मात्र, कोरोनाने सर्वच व्यवस्था कोलमडून टाकली. त्यात शिक्षण आणि शाळादेखील सुटली नाही. वर्षभर शाळा बंद राहिल्या. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निर्माण झाला. त्याचे स्वागत करण्यात आले. शहरी भागातील खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी तो उपक्रम बऱ्यापैकी चालविला परंतु दुर्गम व ग्रामीण भागात त्याची वाताहत झाली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे जेथे पुस्तके घेण्यास पैसे नाहीत तेथे तो पालक आपल्या पाल्यांसाठी अँड्राॅईड मोबाईल कुठून घेईल. घेतलाच तर महिन्याला इंटरनेटसाठी पैसे कसे उपलब्ध करेल. दुर्गम भागात अजून वीज पोहचलेली नाही अशा भागात इंटरनेट कसे तग धरेल आणि हे सर्व जरी असले तरी जेथे नियमित शाळेत जाऊन गुणवत्ता सुधारली नाही तेथे ऑनलाईन शिक्षणाने काय साध्य होईल हे सर्व प्रश्न निर्माण झाले आणि ‘शाळा बंद व पण शिक्षण सुरू’ची गत बळजबरीचा मामला सारखी झाली.

असर संस्थेने सलग दोन वर्षे केेलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील दुसरीच्या अवघ्या ३३ टक्के विद्यार्थ्याना वाचता येत होते. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना वजाबाकी येत असल्याची टक्केवारी अवघी १९ टक्के होती. पाचवी ते आठवीच्या अवघ्या नऊ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत होता. यात राज्यातील जिल्ह्यांमध्ये नंदुरबार अगदी तळाला होता. अशीच स्थिती गुणवत्तेच्या इतर बाबतीतदेखील होती.

आता तर वर्षभरापासून विद्यार्थी शाळेपासून लांब होते. काही ठिकाणी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न केले परंतु त्यालाही मर्यादा होत्या. पहिलीचे विद्यार्थी शाळेत न जाता थेट दुसरीत गेले. काय शिकले असतील विद्यार्थी, हा मन सुन्न करणारा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आता कोरोनामुळे शाळा सुरू होऊ दे अथवा नको, परंतु जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी काहीतरी ठोस आराखडा तयार करून तो प्रामाणिकपणे राबविला गेला पाहिजे तरच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य राहील अन्यथा ही पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही हे नक्की.