शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदांसाठी ठोस उपाययोजना कराव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या आरोग्य उपचारासाठी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात एकूण १०४ दवाखाने उभारले आहेत. यात १९ दवाखाने राज्य शासनाची आहेत तर ...

शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या आरोग्य उपचारासाठी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात एकूण १०४ दवाखाने उभारले आहेत. यात १९ दवाखाने राज्य शासनाची आहेत तर ८५ दवाखाने जिल्हा परिषद अंतर्गत येत असतात. याशिवाय पाच पशुचिकित्सकांचा समावेश आहे. यातील ५६ दवाखाने श्रेणी एकचे आहेत. या दवाखान्यांतर्गत शेतकऱ्यांचे साधारण साडेपाच लाख पशुधन येत असतात. तथापि तेवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या पशुधनाकरिता केवळ १६ च पशुधन विकास अधिकारी असून, या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे एक, एका डॉक्टरकडे तीन दवाखान्याचा एकत्रित कार्यभार सोपविण्यात आला आहे. तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दवाखान्यामध्ये अतिशय विदारक चित्र आहे. कारण तेथे या पशुधन अधिकारींवर दवाखान्याबरोबर पंचायत समितीचा पदभार देखील सांभाळावा लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांना जनावरांवर कसरत करत उपचार करावा लागत असतो. अशा वस्तुस्थितीत त्यांचाकडून पुरेसा उपचार मिळणे अशक्य आहे. बहुतेक वेळा जनावरांना प्रभावी उपचार मिळाला नसल्याने आदिवासी शेतकरींची महागडी जनावरे दगावात असल्याची कैफियतदेखील पशुपालकांनी मांडली आहे. वास्तविक रिक्त जागांबाबत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दर महिन्याला अहवाल पाठवून नियुक्ती करण्याची मागणी केली जात असते. परंतु याकडे नेहमीच साफ दुर्लक्ष केले जाते. सद्या जिह्यातील नवापूर तालुक्यात पक्षांवर बर्ड फ्लूची साथ सुरू आहे. साहजिकच त्याची भीती इतर तालुक्यातील जनतेच्या मनामध्येदेखील आहे. शिवाय तेथे पोल्ट्री फार्म सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे तेथूनच चिकनचा माल इतर ठिकाणी येतो. विशेषत: नवापूर मध्ये १२ दवाखाने आहेत. तेथे फक्त दोनच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कार्यभार सुरू आहे.

जिल्ह्यातील रिक्त जागांची वस्तुस्थिती असताना त्या भरण्या बाबत शासनाकडे पाठपुरावा करणे कामी लोकप्रतिधींनीही उदासीन धोरण घेतल्याने आदिवासी पशुपालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाला जिल्ह्यातील दवाखान्यांमध्ये रिक्त जागा भरायचा नसतील तर हे दवाखानेच बंद करण्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बर्ड फ्लूमुळे प्रशासनास बाहेरील जिल्ह्यातील कर्मचारी मागविण्याची वेळ आली आहे. आता तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पशुधन विकास अधिकाऱ्यांची मागणी शासनाकडे करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

स्थायी समितीच्या ठरावाला केराची टोपली

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात पशुवैद्यकीय अधिकारींच्या जागा रिक्त असल्यामुळे निदान मानधन करारावर या जागा भरण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत मंजूर करून जिल्हा नियोजन समितीकडे पाच ते सहा महिन्यांपूर्वीच पाठवला आहे. पशुधनाचा विचार करून तातडीने यावर कार्यवाही होणे अपेक्षित असताना समितीने या ठरावाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाबरोबरच पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तरीही त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नाही. पालकमंत्र्यांनी तरी जिल्हा परिषदेचा ठरावावर जाब विचारावा अशी मागणी आहे. सद्या बर्ड फ्लू बरोबरच वराहांवरही साथ सुरू आहे. दररोज अशा वराहांचा मृत्यूदेखील होत आहे. साहजिकच नागरिकांमध्ये स्वाईन फ्ल्यूची भीती पसरली आहे. प्रशासनाने वराह पालकांना वराहांची लसीकरण करण्याची सक्ती करावी.

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात श्रेणी एकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करिता दर महिन्याला रिक्त जागांच्या अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जातो. त्यासाठी पदाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाने पत्र व्यवहार केला आहे. लवकरच जागा भरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. - डाॅ.यु.डी पाटील, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार.