शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

रिक्त पदांच्या विगतवारीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 11:21 IST

नंदुरबार : राज्य शासनाच्या मेगा भरतीच्या पाश्र्वभुमीवर जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त जागांचा आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवार ...

नंदुरबार : राज्य शासनाच्या मेगा भरतीच्या पाश्र्वभुमीवर जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त जागांचा आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशी देखील अनेक विभागाचे कर्मचारी कार्यालयांमध्ये हजर होते. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेने आघाडी घेत विविध विभागांच्या रिक्त जागांचा तपशील शासनाला कळविल आहे. जिल्हा परिषदेत एकुण 331 जागा भरण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.राज्य शासनाच्या मेगा भरतीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. विशेषत: बेरोजगार युवकांमध्ये याबाबत विशेष उत्सूकता दिसून येत आहे. तब्बल 72 हजार जागा भरल्या जाणार असल्यामुळे अनेक बेरोजगार युवकांना आस लागून आहे. एकीकडे बेरोजगार युवकांची उत्सूकता वाढली आहे तर दुसरीकडे शासकीय स्तरावर याबाबतच्या प्रक्रियेसाठी हालचाली गतीमान झाल्या आहेत. याबाबत गेल्या आठवडय़ात सर्व विभागांना रिक्त जागांच्या तपशीलाबाबत कळविण्याचे आदेश संबधित विभागांनी दिले होते. त्यामुळे शनिवार व रविवारी देखील कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी दिसून आले होते.विगतवारीचे काम सुरूनंदुरबार जिल्ह्यात सर्व विभागांकडून मंजुर पदे, रिक्त पदे यांची विगतवारी करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात सर्व विभाग मिळून जवळपास आठशे पेक्षा अधीक जागा रिक्त असल्याचा अंदाज आहे. एकटय़ा जिल्हा परिषदेत तीनशेपेक्षा अधीक पदे रिक्त आहेत. याशिवाय महसूलची देखील अनेक पदे रिक्त आहेत. सर्व विभागांची विगतवारीचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा परिषदेत 331 पदे जिल्हा परिषदेत एकुण 331 पदे रिक्त असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञाची आठ, आरोग्य सेवकाची 44, एएनएमची 191 पदे, कनिष्ठ अभियंत्यांची 12 पदे, सहायक कनिष्ठ अभियंत्यांची 31 पदे, कनिष्ठ यांत्रिकीची एक, ज्येष्ठ यांत्रिकी दोन, सुपरवायझर 29,  एलएसएस सहा याशिवाय विविध विभागांचे चार प्रमुख पदे असे एकुण 331 पदे रिक्त असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तलाठीच्या 33 जागाजिल्ह्यात तलाठीच्या 33 जागा रिक्त आहेत. महसूल विभागातर्फे या जागा भरण्यासाठीचा प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे. त्यामुळे तलाठीपदाची देखील एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर भरती होणार आहे.पेसा कायद्यान्वये भरती?शासनातर्फे होणारी भरती ही थेट भरतीअंतर्गत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेसा कायद्याअंतर्गत ही भरती होते किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या लक्षात घेता पेसा कायदा लागू आहे. त्यामुळे स्थानिक आणि आदिवासी उमेदवारांनाच भरतीत प्राधान्य राहणार असल्याचे कायद्यात नमुद आहे. त्यामुळे या भरतीला पेसाचा नियम लागू होतो किंवा कसे याबाबतही अद्याप स्पष्ट झालेले नाही.क्लासचे फुटतेय पेवभरती ही स्पर्धा परीक्षेद्वारे होणार आहे. त्यामुळे येत्या काळात विविध क्लासेसचे पेव फुटणार आहे. काहींनी आतापासूनच त्यासाठी तयारी सुरू केली आहे. स्पर्धा परीक्षा, स्थानिक माहिती, चालू घडामोडी यांची माहिती घेण्यासाठी, मिळविण्यासाठी सध्या बेरोजगार युवकांमध्ये धडपड सुरू आहे. शासकीय नोकरीत भरतीची ही मोठी संधी असल्यामुळे व यापुढे एव्हढी मोठी भरती कधी आणि कशी होईल, तोर्पयत वयोमर्यादा ओलांडली जाणार आहे. अर्थात एजबार होणार असल्यामुळे युवकांचा जास्तीत जास्त प्रय} या भरतीसाठी राहणार आहे.