विद्यार्थ्यांच्या निकालपत्रावर वर्गोन्नतीचा शेरा, सरसकट सर्व विद्यार्थी पुढील वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST2021-05-08T04:31:37+5:302021-05-08T04:31:37+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यंदा निकालपत्रावर वर्गोन्नत असा ...

Class promotion remarks on student results, all students in the next class | विद्यार्थ्यांच्या निकालपत्रावर वर्गोन्नतीचा शेरा, सरसकट सर्व विद्यार्थी पुढील वर्गात

विद्यार्थ्यांच्या निकालपत्रावर वर्गोन्नतीचा शेरा, सरसकट सर्व विद्यार्थी पुढील वर्गात

नंदुरबार : जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यंदा निकालपत्रावर वर्गोन्नत असा शेरा राहणार आहे. दरम्यान, काही खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी निकाल जाहीरदेखील केला आहे.

यंदा कोरोनामुळे परीक्षा न झाल्याने निकाल कसा तयार करायचा या विवंचनेत शिक्षक होते. परंतु, सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय झाल्याने शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. उत्तीर्ण-अनुत्तीर्णच्या शेऱ्यावर वर्गोन्नती असा शेरा लिहिण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. काही शाळांनी अर्थात इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांनी निकाल तयार करून तो ऑनलाईन पालकांना दिलेला आहे, तर शासकीय व अनुदानीत शाळांमधील निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

सर्व शाळांना पत्र देऊन ऑनलाईन निकाल देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. उत्तीर्ण-अनुत्तीर्णच्या शेऱ्यावर वर्गोन्नतीचा उल्लेख राहणार आहे. सरसकट सर्व विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेशित होणार आहेत. -डाॅ. राहुल चौधरी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नंदुरबार.

Web Title: Class promotion remarks on student results, all students in the next class