शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्ड अपडेटसाठी नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा:आधारकार्ड लिंकिंगच्या सर्व सुविधांसाठी शासनाने सक्ती केली असली तरी हे कार्ड अपडेट करण्यासाठी त्याच्यातील घोळ सुटता ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा:आधारकार्ड लिंकिंगच्या सर्व सुविधांसाठी शासनाने सक्ती केली असली तरी हे कार्ड अपडेट करण्यासाठी त्याच्यातील घोळ सुटता सुटत नसून सुविधा केंद्र संचालकदेखील दाद देत नसल्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. शासनाने यातून ठोस मार्ग काढावा, अशी मागणी आहे.                विविध शासकीय योजनांच्या लाभाबरोबरच बँक खाते, पॅनकार्ड काढण्यासाठी आधार लिंकिंग व अपडेट करण्याची सक्ती नागरिकांना करण्यात आली आहे. तथापि, ते अपडेट करताना नागरिकांची मोठी दमछाक होत आहे. कारण त्यातील घोळ सुटता सुटत नसून नागरी सुविधा केंद्रांतील कर्मचारीदेखील दाद देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कुणाच्या आधारकार्डात जन्मतारीख चुकीची झाली आहे तर कुणाच्या नावात बदल करण्यात आला आहे. या चुकांमुळे नागरिकांच्या कार्डात दुरुस्ती होत नाही. त्यातच सर्व्हर डाऊन व विजेचा लपंडाव यामुळे सेतू केंद्र संचालक नागरिकांना ‘उद्या या, परवा याद असे वायदे देत असतात. त्यामुळे त्यांनाही सतत हेलपाटे मारावे लागतात. विशेषत: ग्रामीण भागात शासनाचे सुविधा केंद्रे नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या गावाहून तळोदा शहरात आधार अपडेटकरीता यावे लागत आहे. मात्र, इकडे काम होत नसल्याने त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा  लागत आहे. त्यात त्यांचा वेळ व पैसा वाया जातो तरीही काम होत नाही. अशावेळी मनस्ताप सहन करावा लागतो. आधीच शासनाच्या फीव्यतिरिक्त अधिक चिरीमिरी      द्यावी लागते. तरीही काम होत नाही. त्यामुळे आधार अपडेटससाठी शासनाने नागरिकांची होत असलेली फजिती लक्षात घेऊन ठोस मार्ग काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दुचाकी लावण्यावरुन होतात वादकोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिंकींग करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी नागरिकांना आपले आधार अपडेट्स करावे लागते.आधार अपडेट्स नसेल तर  बँक खाते उघडत नाही. शिवाय पॅनकार्ड सुध्दा मिळत नाही. परिणामी शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागते. साहजिकच आधार लिकींग करावेच लागते. आधार कार्डमध्ये चुका झालेल्या असल्याने नागरिकांचीही सुविधा केंद्रांमध्ये गर्दी होते. शहरातील पालिकेच्या जुन्या इमारतीत सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे नागरिकांची मोठी गर्दी होते. बाहेरून मोटारसायकलवर नागरिक येतात. तेथे दुचाकी लावण्यावरुन वाहनधारकांमध्ये वादविवाद होतात. तीन-चार दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यावेळी काहींनी मध्यस्थी केल्यानंतर मोठे भांडण टळले. नागरी सुविधा केंद्रावर तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने असे वाद होतात.

माझ्या आधार कार्डात जन्म तारीख चुकीची झाली आहे. मी ७० वर्षाचा असताना कार्डात ४० वर्ष झाले आहे. त्यामुळे ते अपडेट्स होत नाही. परिणामी मला शासकीय योजनांपासूनही वंचित राहावे लागत आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी सुविधा केंद्रात जातो तेव्हा केंद्रचालक दाद देत नाही. त्यासाठी सारखे हेलपाटे मारत आहे. मोठ्या रकमेची मागणी केली जाते. आता तर दुरुस्ती होणारच नाही, असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे मनस्ताप होत असून प्रशासनाने यातून मार्ग काढावा.  -भास्कर ठाकरे, नागरिक, तळोदा.