शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चायना मेड यंदा ४० टक्केच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चायना मेड वस्तूंविरोधात जनजागृती होऊन, आंदोलने होऊन देखील शोभेच्या वस्तू, विद्यूत माळा यासह इतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चायना मेड वस्तूंविरोधात जनजागृती होऊन, आंदोलने होऊन देखील शोभेच्या वस्तू, विद्यूत माळा यासह इतर वस्तू या चायनामेडच विकल्या जात असल्याची स्थिती आहे. नंदुरबारात गणेशोत्सवानिमित्त आणि येणाºय विविध सण, उत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या दुकानांमध्ये चायनामेडच्या वस्तूंनाच सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही विक्रेत्यांनी नवीन माल न आणता गेल्या वर्षाचा चायना मेड जुनाच माल विक्रीसाठी ठेवल्याचे सांगण्यात आले.
गेल्या तीन, चार महिन्यात चिनशी झालेल्या तणावपुर्ण संबधामुळे चायनामेडच्या वस्तूंविरोधात वातावरण निर्मिती करण्यात आली होती. अनेक दुकानदार, विक्रेते यांनी देखील चायना मेड माल न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ग्राहकांना स्वस्त:त चांगली व आकर्षक वस्तू पाहिजे असल्यामुळे दुकानदारांचा नाईलाज होत असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात विविध शोभेच्या वस्तू विक्रीसाठी लावण्यात आलेल्या दुकानांमध्ये हे चित्र प्रकर्षाने दिसून येत आहे.
गणेशोत्सवासाठी मागणी
गणेशोत्सवासाठी विद्युत माळांना मागणी वाढली आहे. चायना मेड ऐवजी दुसरी विद्यूत माळ मागितल्यावर त्याची किंमत जास्त राहत असल्यामुळे नाइलाजाने ग्रहकाला चायना मेड विद्यूत माळ घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. अगदी ६० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत आकर्षक विद्यूतमाळा उपलब्ध आहेत. अनेक विके्रेत्यांनी जुनाच स्टॉक विक्रीस काढला आहे.
नवीन स्टॉकच उपलब्ध नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. चिनशी असलेल्या तणावपुर्ण संबधांमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ४० टक्केच चायनामेड माल उपलब्ध होत असल्याचे त्यांचे म्हणने आहे.
भारतीय बनावटीच्या किंमती जास्त
भारतीय बनावटीच्या अर्थात दिल्ली, इंदोरमेड साहित्यही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. परंतु त्यांच्या किंमती जास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परंतु या वस्तू टिकाऊ आणि अनेक दिवस चालणाऱ्या आहेत. त्यामुळे चोखंदळ ग्राहकांकडूनच अशा वस्तूंना मागणी असते. याउलट चायना वस्तू या वापरा आणि फेका स्वरूपाच्या असतात. आता ग्राहकांची मानसिकता बदलत आहे. त्यामुळे यापुढील काळात चायना मेड वस्तूंची मागणी घटेल अशी अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून चायना मेड खेळणी, शोभेच्या वस्तू यांची आयात कमी झाल्याने किरकोळ स्वरूपात दुकानदारांना या वस्तू मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे जुना स्टॉक विक्रीकडे कल आहे.