शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे खात्याला काटेरी जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील पाटबंधारे उपविभाग व इतर कार्यालयांच्या परिसर तसेच कर्मचारी निवासस्थानाच्या आवारात ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील पाटबंधारे उपविभाग व इतर कार्यालयांच्या परिसर तसेच कर्मचारी निवासस्थानाच्या आवारात काटेरी झुडपे वाढली आहेत. परिसराला समस्यांनी वेढले असतांनाही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा बसस्थानकाच्या मागील बाजूस प्रकाशा बॅरेजचे उपविभागीय कार्यालय आहे. त्याच्या मागील बाजूला गुणनियंत्रण उपविभाग, पाटबंधारे, मृद व जलसंधारण उपविभाग, तापी जलविद्युत उपविभाग अशी पाच कार्यालये आहेत. तसेच कर्मचाºयांना राहण्यासाठी ३२ निवासस्थानेही आहेत. या कार्यालयांच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे दर्शन होते. बॅरेज कार्यालयासमोर व मागील बाजूस पावसाळ्यात उगवलेली झाडेझुडपे तीने चार फुट एवढी वाढली आहेत. ही झाडेझुडपे तोडण्याची व साफसफाई करण्याची तसदीही संबंधितांकडून घेतली जात नाही. या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसून स्वच्छतागृह व शौचालयांचीही दुरवस्था झाली आहे. बाहेरून विविध दाखले घेण्यासाठी येणाºया शेतकºयांना बसण्यासाठीही व्यवस्था नाही. अशीच अवस्था याठिकाणी असलेल्या इतर कार्यालयांचीही आहे. येथील तीन एकर जागेत या पाच कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाºयांची निवासस्थाने आहेत. या निवासस्थान परिसरातही घाणीचे साम्राज्य आहे. कार्यालय व निवासस्थान परिसरातील पथदिवे बंद असल्याचे रात्रीच्यावेळी अंधार असतो. घाणीचे साम्राज्य, उगवलेले झुडपे, तुडूंब भरलेल्या गटारी त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. स्वच्छतागृहाची दूरवस्था झाल्याने कर्मचाºयांसह विविध दाखल्यांसाठी येणाºया शेतकºयांनाही लघुशंकेसाठी बाहेर जावे लागते. म्हणजे सुविधा असूनही नसल्यासारखी स्थिती याठिकाणी आहे. येथे वराहांचा नेहमी वावर राहत असल्याने घाणीचे प्रमाण वाढले आहे. येथील कार्यालय व कर्मचारी निवासस्थान परिसरात नेहमी स्वच्छता राहण्यासाठी व इतर सुविधांसाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी येथे भेट देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.येथील कार्यालयांमध्ये आस्थापनेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांकडे इतर ठिकाणचाही अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे काही कर्मचारी शहादा, धुळे व इतर ठिकाणी कार्यरत आहे. काही कर्मचाºयांनी तर निव्वळ आदिवासी क्षेत्रातील भत्ता मिळावा यासाठी येथे नियुक्ती मिळवून इतरत्र प्रतिनियुक्तीवर काम करीत असल्याचे समजते. त्यामुळे अशा कर्मचाºयांची चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी व असे प्रकार थांबविण्याची आवश्यकता आहे. बॅरेज उपविभागाचे मुख्य अभियंता के.एस. बांगर यांच्याकडे कामाचा व्याप जास्त आहे. इतर कार्यालयांचा भार त्यांच्याकडे असल्याने त्यांना बºयाचवेळेला धुळे येथेच राहावे लागते. आठवड्यातून फक्त दोन किंवा तीन दिवस ते प्रकाशा येथे येतात. त्यामुळे विविध दाखल्यांसाठी येणाºया शेतकºयांना वारंवार फिरफिर करावी लागते.