शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेसाठी सभापती थांबले ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी आरोग्य विमागामार्फत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या. परंतु तळोद्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी आरोग्य विमागामार्फत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या. परंतु तळोद्याचे पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे यांनी आणलेल्या रुग्णालाच तळोदा उपजिल्हा रुग्णालयात चार तासाची प्रतिक्षा करुनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आरोग्य सेवेबाबत शोकांतिका व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना अपेक्षेनुसार व वेळेवर उपचार मिळावा यासाठी आरोग्य विभागामार्फत स्वतंत्र वैद्यकीय पथकांसह १०८ रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे येथील खाजगी संस्थेमार्फत साधारण सात रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या आहे. त्यामुळे अवघ्या जिल्ह्यातील रुणांना वेळेवर उपचार मिळण्याची जनतेला अपेक्षा आहे. परंतु प्रत्यक्षात उलटे होत असल्याने जनतेत या सेवेबाबत नाराजी शिवाय तक्रारीही वाढल्या आहे. गंभीर स्थितीतील रुग्णांसाठी असली तरी ही सेवा रुग्णांना वेळेवर मिळत नसल्याचा आरोप रुग्णांच्या पालकांकडून करण्यात येत आहे. बऱ्याचवेळा रुग्णवाहिकेवर हजर चालक नसतो तर कुठे वैद्यकीय अधिकारी नसल्याचा अनुभव जिल्ह्यातील रुग्णांना नेहमीच येत आहे.अशा या भोंगळ कारभाराचा अनुभव तळोद्याचे पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे यांनाच आला. रापापूर ता.तळोदा येथील देविसिंग नारायण ठाकरे या व्यक्तीने आजाराला कंटाळून विष प्राशन केले. त्यात त्याची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार होणे नितांत गरज होती. त्याला तळोदा उपजिल्हा रुग्णाललयात आणत त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला नंदुरबार यथील जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यावे लागत होते. त्यानुसार त्या रुग्णाला १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक होते. परंतु वैद्यकीय अधिकारीच नसल्याचे आढळून आले.रुग्ण वाहिकेवर पूर्ण सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सभापती ठाकरे यांनीच संपर्क केला. मात्र वैद्यकीय अधिकारी दोन तासांनी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. परंतु मात्र चार तास उलटूनही वैद्यकीय अधिकारी आले नाही. तातडीच्या उपचाराची गरज असल्यामुळे अखेर प्रतापपूर येथील रुग्णवाहिका पाचारण करावी लागली. त्याद्वारे रुग्णाला नंदुरबारकडे हलविता आले.वास्तविक या रुग्णवाहिकांसाठी प्रशासनाकडून दरमहा तीन लाखांचा खर्च केला जातो. असे असतांनाही रुग्णांना वेळेवर व अपेक्षेनुसार सेवा मिळत नाही, ही या जिल्ह्यासाठी मोठी शोकांतिका असून याबाबत कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त कहोत आहे.

रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्यामुळे चार महिन्यांपूर्वी एका रुग्णाला जीव गमवावा लागतो. मागील नोव्हेंबर महिन्या कोठार येथील गंभरी प्रकृतीच्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात हलविणे आवश्यक होते. त्यानुसार परंतु तळोदा रुगणालयामार्फत वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर त्याला खाजगी वाहनाने न्यावे लागले. परंतु वेळेअभावी त्या रुग्णाचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे या सेवेबाबत शोकांतिका व्यक्त करण्यात येत आहे.