शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

नंदुरबार : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९० व्या जयंतीनिमित्त बालवीर चौकात प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवा ...

नंदुरबार : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९० व्या जयंतीनिमित्त बालवीर चौकात प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय संगेकर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी, महादू हिरणवाळे, अशोक यादबोले, संभाजी हिरणवाळे, हेमंत नागापुरे, विशाल हिरणवाळे, दीपक गोडळकर, गोपाळ गवळी, प्रा. एकनाथ हिरणवाळे, नितीन पाटील, साहुल कुशवाह, अमेय संगेकर आदींसह गवळी समाजबांधव उपस्थित होते. यावेळी कर्नाटक राज्यातून आणलेल्या महात्मा बसवेश्वर यांचे जीवन चरित्र ग्रंथ आदी साहित्याचे घरीच अध्ययन करण्यात आले. महात्मा बसवेश्वर यांच्यासह छत्रपती संभाजी महाराज तसेच भगवान परशुराम जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र बसव परिषद आणि वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था, शहीद शिरीषकुमार मित्रमंडळ, शिवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी संजय संगेकर यांनी कोरोनाशी लढा देताना शासन नियमांचे पालन करत प्रत्येकाने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. याशिवाय महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. महात्मा बसवेश्वर यांच्यासह धर्मवीर संभाजी महाराज तसेच भगवान परशुराम जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करत अभिवादन करण्यात आले.