शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयकडून शहाद्यात कापूस खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी केंद्रात सीसीआयकडून सोमवारपासून कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी केंद्रात सीसीआयकडून सोमवारपासून कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कापूस आता विक्रीसाठी काढल्याने बाजार समितीच्या शेडमध्ये कापूस विक्रीसाठी आलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.शहादा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गेल्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कूपनलिका आटल्याने बहुतांश शेतकºयांनी जिरायती कापूस लागवडीवर भर दिला होता. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये सीसीआयकडून होणारी कापूस निर्यात थांबली असल्याचे समजते. शिवाय साठा करण्यासाठी जागा नसल्याने कापूस खरेदी थांबवण्यात आली होती. कापूस खरेदी बंद झाल्याने शेतकºयांचे हाल सुरू झाले होते. यंदा कापसाचा हंगाम लांबल्याने बहुतांश ठिकाणी अद्यापही कापसाची वेचणी सुरू आहे. मध्यंतरी सीसीआयने कापसाची खरेदी बंद केल्याने अर्थकारण बिघडू नये म्हणून बहुतांश शेतकºयांनी खेडा खरेदीला प्राधान्य देत घरबसल्या कापूस विक्री केली होती. निर्माण झालेल्या या स्थितीवर तोडगा काढून कापूस खरेदी करण्याचे आदेश केंद्रांना दिले होते. त्यानुसार सोमवारी शहादा केंद्रात सकाळी कापूस खरेदी सुरू करण्यात आली.२५० वाहने दाखलसीसीआयने कापूस खरेदी पुन्हा सुरू केल्याचे कळताच शेतकºयांनी आपला कापूस विक्रीसाठी आणला आहे. बाजार समितीच्या आवारात सुमारे २५० वाहने दाखल झाली आहेत. त्यातील १९० वाहनांमधील कापसाची सोमवारी मोजणी झाली. प्रतिक्विंटल पाच हजार २३२ ते पाच हजार ४५० या दरम्यान कापसाला भाव देण्यात येत असल्याने बहुतांश शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. सीसीआय शेतकºयांना कापूस खरेदी केल्यानंतर किमान आठ दिवसात पेमेंट करते. त्यामुळे लहान शेतकºयांनी मात्र आपला कापूस रोख रक्कम देणाºया जिनिंग तसेच खेडा खरेदी करणाºया व्यापाºयांना देणे पसंत केले आहे. शहादा येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात आतापर्यंत एक लाख २५ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. आता त्यात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येते.