जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबधीत अधिकारी करतील गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:33 IST2020-06-23T11:33:11+5:302020-06-23T11:33:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जमावबंदी कालावधीत प्रतिबंधीत करण्यात आलेल्या बाबींचे उल्लंघन झाल्यास फिर्याद दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड ...

In case of violation of the curfew order, the concerned authorities will file a case | जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबधीत अधिकारी करतील गुन्हे दाखल

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबधीत अधिकारी करतील गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जमावबंदी कालावधीत प्रतिबंधीत करण्यात आलेल्या बाबींचे उल्लंघन झाल्यास फिर्याद दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी संबंधित विभाग आणि अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.
जमावबंदी कालावधीत ५ पेक्षा अधिक व्यक्ती किंवा समूह जमा झाल्यास. रात्री ९ ते सकाळी ५ दरम्यान फिरण्यास असलेल्या बंदीचे उल्लंघन झाल्यास. आंतरजिल्हा विना परवाना प्रवास केल्यास, प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्ती इतर क्षेत्रात फिरल्यास आणि जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व आठवडे बाजार भरविल्यास पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी फिर्याद दाखल करतील.
सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू सेवन करणे व थुंकणे, दुकानात प्रत्येक व्यक्तीमध्ये ६ फुटाचे अंतर न ठेवणे व एकाचवेळी ५ पेक्षा अधिक ग्राहक असल्यास कारवाई होईल. तसेच बाजार किंवा दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेव्यतिरिक्त सुरू ठेवल्यास नगरपालिका किंवा नगर पंचायत क्षेत्र मुख्याधिकारी व ग्रामीण क्षेत्रासाठी विस्तार अधिकारी फिर्याद दाखल करतील.
सार्वजनिक ठिकाणी दारुचे सेवन केल्यास राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी, सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीसाठीच्या निदेर्शाचा भंग केल्यास मोटार वाहन विभागाचे व पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी, विवाह समारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्ती तसेच प्रेतयात्रेत २० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असल्यास व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास संबंधीत क्षेत्रातील इन्सिडंट कमांडर यांच्या निदेर्शान्वये महसूल किंवा पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी फिर्याद दाखल करतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. करण्यात येत असलेली कारवाई जिल्हा नियंत्रण कक्षास तात्काळ अवगत करावी, असेही आदेशीत करण्यात आले आहे.

Web Title: In case of violation of the curfew order, the concerned authorities will file a case