म्हसावद येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास

By मनोज शेलार | Updated: April 23, 2023 18:51 IST2023-04-23T18:51:11+5:302023-04-23T18:51:33+5:30

शनिवारी रात्री अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून गावी गेलेल्या परिवारांच्या बंद घराचे कुलूप तोडून चारही ठिकाणी एकाच पद्धतीने चोरी करण्यात आलेली आहे.

Burglary at four places in one night in Mhasawad, thousands lost | म्हसावद येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास

म्हसावद येथे एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास

नंदुरबार : येथे रविवारी पहाटे चार ठिकाणी घरफोडी झाली असून म्हसावद गावात ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. हजारो रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. शनिवारी रात्री अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून गावी गेलेल्या परिवारांच्या बंद घराचे कुलूप तोडून चारही ठिकाणी एकाच पद्धतीने चोरी करण्यात आलेली आहे.

यात मल्हारराव बापू ठाकरे, देवानंद झावरू धनगर, संदीप रूबाबसिंग चव्हाण, धनराज निंबादास जयस्वाल यांच्या घराचा समावेश आहे. मल्हारराव ठाकरे यांचेकडे चोरी करताना चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना चोरानी बाहेरून कडी लावून दिली होती. तीन घरांचे दरवाज्याच्या कड्या तोडलेल्या तर चव्हाण यांच्या दरवाज्याची कडी न तुटल्याने दोन्ही कुलूप तोडलेले होते. 

चव्हाण हे नाशिक येथे रूग्णालयात तर उर्वरीत तीन्ही जण अक्षय्यतृतीया निमित्त गावाला गेलेले होते. हजारो रुपयांचा ऐवज चोरीस गेला असून घरमालक आल्यावर अधीक तपशील कळणार आहे. याबाबत म्हसावद पोलीसात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 

Web Title: Burglary at four places in one night in Mhasawad, thousands lost