शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बैलांचा साज विक्रेत्यांना शहाद्यात ग्राहकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शेतकरी राजासाठी महत्त्वाचा असलेला पोळा हा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र यावर्षी ...



लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शेतकरी राजासाठी महत्त्वाचा असलेला पोळा हा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकरी खरेदीसाठी बाजारात दाखल न झाल्याने विक्रेत्यांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा लागली आहे.
शेत शिवारामध्ये शेतकºयाच्या खांद्याला खांदा लावून साथ देणाºया सर्जा राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. हा सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांकडून या सणासाठी लागणाºया वस्तूंची खरेदी झालेली नसल्याचे दिसून येते. शहादा शहरात विविध भागातून पोळा सणानिमित्त बैलांच्या सजावटीसाठी व वर्षभर लागणाºया इतर वस्तू विक्रीसाठी दाख झालेल्या विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पोळा हा सण काही दिवसांवर आला असूनदेखील कोरोनाच्या भीतीपोटी शेतकरी शहरात खरेदीसाठी येत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे बैलांसाठी लागणारे विविध साहित्य व साज विक्रेत्या व्यापाºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. दरवर्षी पोळा सण उत्साहाने साजरे करण्यासाठी शेतकºयांकडून दोरखंड, नात, मोरखी, गोंडा, सिरधा, सेल, जोधा आदी साहित्य खरेदी करण्याची लगबग असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे शेतकरी बाजारपेठेत दिसत नाही.