शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

आदिवासी कारखान्याचे बाॅयलर अग्नीप्रदीपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारेचा १८ वा गळती हंगाम नोव्हेंबरच्या पुढील पंधरवाड्यात सुरू होईल. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारेचा १८ वा गळती हंगाम नोव्हेंबरच्या पुढील पंधरवाड्यात सुरू होईल. तसेच मागील हंगामाचे एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांची रक्कम बॅकेत जमा केली आहे. याबाबत एक ही शेतकऱ्यांची तक्रार नाही. तसेच ऊस तोडणी मजुरांची रक्कमदेखील अदा करण्यात आली आहे, असे प्रतिपादन साखर कारखान्याचे व्यवस्थापक विजयानंद कुशारे यांनी १८ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात केले आहे.आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारेचा १८ वा गळीत हंगाम दसऱ्‍याच्या शुभमुहूर्तावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता बॉयलर अग्नीप्रदीपन करून शुभारंभ करण्यात आला. कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद अमृत भानुदास पाडवी व त्यांच्या पत्नी मंगलाबाई अमृत पाडवी, कारखान्याचे संस्थापक चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री सुरूपसिंग नाईक, आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.सध्या देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शासनाच्या आदेशान्वये फिजिकल अंतराचे पालन करून  बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम साध्या पद्धतीने व कमी लोकांच्या उपस्थितीत घेण्यात आला.या वेळी संचालक बाळू नाईक, जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, कारखान्याचे व्हा.चेअरमन सखाराम गावीत, संचालक मगन वळवी, भामटू भिल, लक्ष्मन कोकणी, सयाबाई नाईक, विना वसावे, छगन वसावे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रतनजी गावीत, कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गावीत, धिरसिंग गावीत, दिगंबर गावीत, तानाजी वळवी, पंचायत समिती सदस्य दारासिंग गावीत, दशरथ गावीत, रायपूरचे सरपंच ईश्वर गावीत, तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व पदधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कारखान्याचे कार्यालयीन अधिक्षक दिलीप पवार तर आभार भुपेंद्र वसावे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुभाष माळी, ईश्वर जोशी, प्रभाकर निकम, अनिल पाटील, पीतांबर महाजन, अनंतराव देसाई, प्रकाश वळवींसह सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी परीश्रम घेतले.