शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत बालिकेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या पाच दिवसंपासून कढेल ता. तळोदा येथून अपहरण झालेल्या ऊसतोड मजुराच्या दहा वर्षीय जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या पाच दिवसंपासून कढेल ता. तळोदा येथून अपहरण झालेल्या ऊसतोड मजुराच्या दहा वर्षीय जखमी बालिकेचा मृतदेह गुजरात मधील पिसावर शिवारातील दादरचा शेतात आढळून आला. तिच्या मृतदेहाचे निजर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आता पोलिसांपुढे संशयीतांना शोधण्याचे आव्हान आहे.  धडगाव तालुक्यातील काकर्दाचा घाटली आसरीपाडा येथील  ऊसतोड मजूर तळोदा तालुक्यातील कढेल शिवारात उतरले आहेत. हे मजूर आपल्या पाढाव असलेल्या ठिकाणाहून मंगळवारी सकाळी दुसऱ्या उसाच्या क्षेत्रात ऊस तोडणी साठी जात होते. त्याचवेळी मुन्नी मोत्या पटले ही दहा वर्षीय बालिका रस्ता ओलांडून पलीकडच्या शेतात जात असतांना तिला भरधाव दुचाकीने धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. दवाखान्यात नेत असल्याचे सांगून दुचाकीस्वाराने तिला नेले. परंतु नंतर ती सापडलीच नाही. शोधाशोध केल्यानंतर तळोदा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विविध पथकांद्वारे बालिकेचा शोध घेतला जात होता. त्याच दरम्यान, शनिवारी सकाळी  पिसावार गावातील मजूर कामासाठी शेतात जात असताना त्यांना जवळच्या दादरच्या शेतात मृतदेहाच्या उग्रवास आला. त्यांनी पिसावर गावाच्या सरपंचास ही माहिती दिली. ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खात्री केल्या नंतर  तळोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नंदलाल पाटील यांना कळविले. बालिकेच्या मृतदेहाचे शव विच्छेदन निझर येथील उपजिल्हा रुग्णलयात करण्यात आले. आपल्या पोटाच्या गोळ्यां चा मृतदेह पाहून तिच्या आई,वडिलांनी एकच हंबरडा फोडला होता. आता संशयीतांपर्यंत पोहचण्याचे आव्हान पोलिसांपुढे  आहे.