शहादा येथील शिबिरात ४१ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:32 PM2020-06-06T12:32:08+5:302020-06-06T12:32:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मी ...

Blood donation of 41 donors in the camp at Shahada | शहादा येथील शिबिरात ४१ दात्यांचे रक्तदान

शहादा येथील शिबिरात ४१ दात्यांचे रक्तदान

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मी कोविड योद्धा, मी रक्तदाता’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४१ दात्यांनी रक्तदान केले.
कोरोनाशी लढा देण्यासाठी शहादा शहरातील विविध सामाजिक संघटना सेवा व मदतकार्य करीत आहेत. त्यास तालुका प्रशासनही प्रोत्साहन देत सहभागी होत आहे. केवळ समाजमाध्यामांचे आवाहन आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधून ४१ रक्तदात्यांनी प्रतिसाद देत शिबिर यशस्वी केले. या वेळी प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे, महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष डॉ.शशांक कुलकर्णी, शहादा शाखा अध्यक्ष डॉ.बी.डी. पाटील, सुनीता पटेल, ज्येष्ठ नागरिक संघाचे डी.एच. पाटील, सेवा दलाचे राज्य मंडळ सदस्य कैलास भावसार, विचारधारा फाऊंडेशनचे तात्याजी पवार, रवींद्र पवार, सेवा दलाचे कार्यध्यक्ष माणक चौधरी, आर्ट आॅफ लिव्हींगचे किशोर पाटील, जायण्ट्स ग्रुपचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, लियाकतअली सैयद, डॉ.खलील शाह आदी उपस्थित होते.
शिबिरासाठी अंनिसचे कार्यकर्ते व शहादा शाखेचे कार्याध्यक्ष संतोष महाजन, प्रधान सचिव अरिफ मणियार, धीरज पाटील, हितेश ईशी, खंडू घोडे, धीरज शिरसाठ, राहुल गवळे, हिंमत चव्हाण, प्रदीप केदारे, हेमंत बोरसे, अशोक पाटील, श्रीकांत बाविस्कर, विनायक सावळे, भटू वाकडे, जयेश केदारेसह शहादा ब्लड बँकेचे डॉ.नाजीम तेली व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

Web Title: Blood donation of 41 donors in the camp at Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.