शहादा येथील शिबिरात ३० दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:25+5:302021-05-10T04:30:25+5:30

शिबिराचे उद्‌घाटन पालिकेचे गटनेते प्रा. मकरंद पाटील यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून रमाशंकर माळी, हेरंब गणेश ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल ...

Blood donation of 30 donors in the camp at Shahada | शहादा येथील शिबिरात ३० दात्यांचे रक्तदान

शहादा येथील शिबिरात ३० दात्यांचे रक्तदान

शिबिराचे उद्‌घाटन पालिकेचे गटनेते प्रा. मकरंद पाटील यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून रमाशंकर माळी, हेरंब गणेश ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी, ईश्वर वारुडे, पत्रकार हिरालाल रोकडे, श्री छत्रपती ब्लड फाउंडेशन ग्रुपचे रामकृष्ण पाटील, टोकरे कोळी युवा मंचचे संस्थापक नितीन कोळी, कोठली येथील राहुल पाटील, बादलसिंग गिरासे, युवकमित्रचे संस्थापक प्रवीण महाजन, मनोज वारुडे, प्रकाश वारुडे आदी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोना लसीकरण काळातही ३० युवकांनी रक्तदान केल्याबद्दल युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. रक्तसंकलनकामी शासकीय जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्राचे डॉ. गोविंद शेळके, डॉ. सागर वसावे, डॉ. शशिकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी महेंद्र चव्हाण, जयेश सोनवणे, रुग्णसेवक लखन तेजी, शरद पवार यांचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी गोपालसिंग गिरासे, प्रकाश वारुडे, दिनेश माळी आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation of 30 donors in the camp at Shahada