विसरवाडीत ८३ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:05 IST2020-04-08T13:05:19+5:302020-04-08T13:05:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील श्रीराम मंदिर हिंदू धार्मिकस्थळ संस्थान विसरवाडीतर्फे कोरोना विषाणू प्रभावच्या पार्श्वभूमीवर ...

Blood donation of 2 donors in forgetfulness | विसरवाडीत ८३ दात्यांचे रक्तदान

विसरवाडीत ८३ दात्यांचे रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील श्रीराम मंदिर हिंदू धार्मिकस्थळ संस्थान विसरवाडीतर्फे कोरोना विषाणू प्रभावच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात ८३ दात्यांनी रक्तदान केले.
या वेळी विसरवाडीचे सरपंच बकाराम गावीत, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, धार्मिक संस्थानचे अध्यक्ष विजय अग्रवाल, उपाध्यक्ष कुणाल अनिल चौधरी, सचिव संजय मातादीन शर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद वाळवी डॉ.अजय कुवर, डॉ.अमीन जाधव, डॉ.विद्या वसावे उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तसाठ्यात कमतरता येऊ नये म्हणून येथील युवकांनी स्वयंस्फूर्तीने हा अभिनव उपक्रम राबविला. सोशल मीडियावरील हिंदू एकता समिती या व्हाट्सअप ग्रुपवर रक्तदान शिबिराचे आयोजन व रक्तदात्यांना आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद देऊन ८३ दात्यांनी रक्तदान केले. त्यात कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी अनिल राठोड तसेच महिला व युवतींनीही सहभाग नोंदविला.
शिबिरासाठी शासकीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र चव्हाण, जयश्री सोनवणे यांचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी चेतन मराठे, प्रभात शर्मा, अशोक गावीत, रवींद्र अग्रवाल, मयूर चव्हाण, महेंद्र सूर्यवंशी, संदीप अग्रवाल, विजय चव्हाण, दिनेश जयस्वाल, महेश कटारिया, सागर जाधव, मयूर अग्रवाल, अर्जुन कुंभार, सचिन जाधव यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation of 2 donors in forgetfulness