काळा बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:34 IST2020-05-04T12:33:55+5:302020-05-04T12:34:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेशनच्या तांदुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून ४२ कट्टे तांदूळ आणि वाहन ...

Black market ration rice confiscated | काळा बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ जप्त

काळा बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रेशनच्या तांदुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून ४२ कट्टे तांदूळ आणि वाहन असा अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ओहवा, ता.अक्कलकुवा येथे ही घटना घडली. याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणपत कर्मा पाडवीव व गिरीश कर्मा पाडवी, रा.ओहवा, ता.अक्कलकुवा असे संशयीतांची नावे आहेत. लॉकडाऊनच्या काळात दारिद्रय रेषेखालील आणि प्राधान्य कुटूंबांना देण्यात येणाºया तांदुळाचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याची शहनिशा प्रशासन करीत असतांना अक्कलकुवा तालुक्यातील ओहवा-खाई रस्त्यावर रेशनचा तांदूळ पकडण्यात आला. ओहवा येथून खाई मार्गे हा तांदुळ काळा बाजारात जात होता. ही बाब पोलिसांना कळताच वाहन अडविण्यात आले. त्यात ४२ कट्टे रेशनचा तांदूळ होता. त्याची किंमत ४,८३० रुपये इतकी आहे. पोलिसांनी वाहनासह तांदूळ असा एकुण दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पुरवठा निरिक्षक सुरेश दौलत चौधरी यांनी फिर्याद दिल्याने मोलगी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक एम.डी.पगार करीत आहे.

Web Title: Black market ration rice confiscated