शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘भोला’च्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारातील परदेशीपुरा भागातील दुकानाचे शटर उचकवून केलेल्या चोरीतील ‘भोला’ला अवघ्या २४ तासात एलसीबीने अटक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारातील परदेशीपुरा भागातील दुकानाचे शटर उचकवून केलेल्या चोरीतील ‘भोला’ला अवघ्या २४ तासात एलसीबीने अटक करून २३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडून इतरही घरफोडीचे गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.शहरातील परदेशीपुरा भागातील अगरबत्ती होलसेल विक्रेत्याचे दुकान फोडून सीसीटव्ही कॅमेरासह लॅपटाईप व रोख रक्कम असा एकुण २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज १६ रोजी चोरून नेला होता. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुकानाच्या शटरची एक बाजूचे कुुलूप तोडून व ते उचकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी पहिले दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे काढले. त्यानंतर काऊंटरवर असलेला लॅपटॉप तसेच रोख ८०० रुपये चोरट्यांनी चोरून नेले. एकुण २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास झाला होता.याबाबत एलसीबीने समांतर तपास सुरू केला होता. एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळालेल्या माहितीनुसार याच भागात राहणारा गिरीष राजू वळवी (२१) उर्फ भोला, रा.परदेशीपुरा याने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पथकाला पाठविण्यात आले. घरी लपून छपून येत असताना पथकाने त्याला झडप घालून ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली. शिवाय चोरलेला ऐवज प्लॅस्टिकच्या गोणीत भरून घराच्या छतावर ठेवल्याचे सांगितले. तो ऐवजही जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, कर्मचारी राकेश मोरे, राकेश वसावे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.