भरधाव ट्रकची एस.टी.ला धडक, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:19 IST2019-12-03T12:19:48+5:302019-12-03T12:19:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एस.टी.बसला धडक दिल्याने बसचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान   ...

Bhargava truck hit ST, driver injured | भरधाव ट्रकची एस.टी.ला धडक, चालक जखमी

भरधाव ट्रकची एस.टी.ला धडक, चालक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एस.टी.बसला धडक दिल्याने बसचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान    झाल्याची घटना तिखोरा-कलसाडी रस्त्यावर कन्हेरी नाल्याजवळ 1 रोजी रात्री आठ वाजता घडली. एस.टी.चालक जखमी झाला असून सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
शहादा आगाराची एस.टी.बस रात्री आठ वाजता तिखोरा गावाकडून कलसाडी गावाकडे जात असतांना कन्हेरी नाल्याजवळ उभी होती. समोरून भरधाव आलेल्या ट्रकने बसला चालक साईडला जबर धडक दिली. 
यात एस.टी.चालक चतुर शिवा सोनवणे, रा.लोणखेडा हे जखमी झाले. याशिवाय एस.टी.बसचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. 
याबाबत बस चालक चतुर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक संजय वेडू बच्छाव यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला        आहे. तपास हवालदार मोरे करीत आहे. 
 

Web Title: Bhargava truck hit ST, driver injured