शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल ते जुलै दरम्यान जिल्ह्यातील ५४३ नागरिकांना केला सापाने दंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या काळात ५४३ जणांना सर्पदंश झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या काळात ५४३ जणांना सर्पदंश झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दीड हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे़ यात धडगाव आणि अक्कलकुवा हे दोन तालुक्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आली आहे़
पावसाळ्यात दुर्गम भागासह सपाटीच्या गावांमध्ये सर्पदंश होवून मृत्यू होण्याच्या घटना घडतात़ या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने यंदा जुलै महिन्यापूर्वीच सर्व ६० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २९० पेक्षा अधिक उपकेंद्रांमध्ये लसींचा पुरवठा केला आहे़ यात प्रामुख्याने दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांना प्राधान्य देण्यात आले असून यंदा सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांची नोंद नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यात पावसाळ्यात किमान ५०० पेक्षा अधिक जणांना सर्पदंश होतो़ यात मृत्यूच्या घटनाही घडल्या असल्याने आरोग्य विभागाने धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील सुमारे २६ आरोग्य केंद्र आणि दोन्ही बोट अँम्ब्युलन्स याठिकाणी लसींचा पुरवठा केला आहे़
तूर्तास सर्व आरोग्य केंद्रांमध्ये १ हजार लसी ह्या शिल्लक आहेत़ तर दीड हजार लस जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ताब्यात आहेत़ वेळोवेळी लसीचा पुरवठा होणार आहे़ सर्पदंश झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर झाल्यास त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष किटचाही पुरवठा करण्यात आला आहे़
जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या तीन महिन्याच्या काळात झालेल्या ५४३ सर्पदंश केसेसपैकी १३७ धडगाव तर १२३ ह्या अक्कलकुवा तालुक्यात घडल्या आहेत़ दुर्गम भागाचा समावेश असलेल्या या दोन तालुक्यात नवीन लसींचा तातडीने पुरवठा करण्यात आला आहे़
दर महिन्यात सर्पदंश केसेस आणि लसीकरणाचा आढावा घेत पुरवठा करण्यावर आरोग्य विभाग भर देत असल्याची माहिती देण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एऩ डी़ बोडक यांच्याकडून देण्यात आली आहे़