शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

बेड मिळत नाही, ही तक्रारच येणार नाही!- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

गेल्या वर्षी जेेव्हा कोरोनाचा संसर्ग आला त्यावेळी जिल्ह्यात जेमतेम ५० बेडची सुविधा होती. परंतु परिस्थितीचे गांभीर्य पाहून आहे त्या ...

गेल्या वर्षी जेेव्हा कोरोनाचा संसर्ग आला त्यावेळी जिल्ह्यात जेमतेम ५० बेडची सुविधा होती. परंतु परिस्थितीचे गांभीर्य पाहून आहे त्या यंत्रणेत आणि सोयीतून सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला जनता, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही सहकार्य मिळाल्याने आज जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा बऱ्यापैकी विस्तार झाला आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून १२४० ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची सुविधा असून जिल्हाभरातील आयसोलेशन वॅार्डातही पाच हजारांपेक्षा अधिक बेड आहेत. याशिवाय अजूनही नवीन ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती करण्यासाठी तयारी सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता रुग्णांना बेड मिळत नाही ही तक्रारच राहणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोनाची साथ वाढली असा आरोप होत आहे?

-कुणी काय तक्रार करावी किंवा आरोप करावे याबाबत आपण बोलू शकत नाही. पण गेल्या वर्षभरापासून प्रशासन अहोरात्र परिश्रम घेऊन काम करीत आहे. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. या जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा तोकड्या आहेत. जिल्ह्यात एकही वैद्यकीय महाविद्यालय नाही, डॅाक्टर नाहीत, परिचारिका नाहीत, अनेक पदे रिक्त आहेत. जेेव्हा संसर्ग आला तेेव्हा तपासणीसाठीही दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून होतो. मात्र सुरुवातीला स्वतंत्र आधुनिक लॅब केली. त्याचा विस्तारही केला. ऑक्सिजन बेडची सुविधा वाढवत गेलो. स्वतंत्र ऑक्सिजन प्लान्ट बसविले. खासगी रुग्णालयातील सुविधांचा विस्तार केला. आयसोलेशन वॉर्ड वाढविले. गावपातळीवर सर्वेक्षण मोहीम यासह जे जे शक्य ते प्रशासनाने केले आहे. त्याचे चांगले परिणाम आज सर्वजण पाहत आहेत. अगदी दुसऱ्या जिल्ह्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत.

ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण...

जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्रकल्प सुरू केेले आहेत. शहाद्यात तिसरा आणि तळोदा आणि नवापूर येथेदेखील दोन मिनी प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात लिक्विड टँक बसविण्याची प्रक्रिया सुरू असून तेथे २० मे. टन ऑक्सिजनचा साठा राहील अशी व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा रुग्णालयात पाईपने ३०० बेडला ऑक्सिजन पुरवठा करण्याची सुविधा होत आहे. सध्या शासकीय ४४० व खासगी मिळून एकूण १२४० ऑक्सिजन बेड आहेत. त्यांचेही विस्तारीकरण सुरू आहे.

गावपातळीवर आयसोलेशन...

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, होस्टेल्स या ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड करण्यात आले आहेत. या ठिकाणी जवळपास पाच हजार ६० बेड असून आता होम आयसोलेशन रुग्णांची संख्या कमी करणार आहोत.