लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ट्रॅव्हल्स चालकाने कट मारल्याचा जाब दुचाकी चालकांनी विचारला असता त्याचा राग येवून ट्रॅव्हल्समधील लोकांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना चिंचपाडानजीक घडली. जमावाने धाव घेत ट्रॅव्हल्स चालकाला जाब विचारला.फिरोज वसावे व प्रितेश वसावे असे युवकांची नावे आहेत. त्यांना चिंचपाडा मिशन हॉस्पीटलला दाखल करण्यात आले. महामार्गावर वराडीपाडा नजीक बुधवारी दुपारी ही घटना घडली. ही माहिती वसावे यांच्या नातेवाईकांना कळताच जमावाने घटनास्थळी धाव घेतली तसेच त्यांना जाब विचारला. याबाबत उशीरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}