अंगणवाडीच्या नोकरीतून काढल्याच्या संशयातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:23 IST2020-06-17T12:21:47+5:302020-06-17T12:23:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील जुगणी हिरीचापाडा येथे अंगणवाडी सेवीका पदावरुन काढून टाकल्याच्या संशयातून दोघांना मारहाण करण्यात ...

Beaten on suspicion of being fired from Anganwadi job | अंगणवाडीच्या नोकरीतून काढल्याच्या संशयातून मारहाण

अंगणवाडीच्या नोकरीतून काढल्याच्या संशयातून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील जुगणी हिरीचापाडा येथे अंगणवाडी सेवीका पदावरुन काढून टाकल्याच्या संशयातून दोघांना मारहाण करण्यात आल्याची घटना १० जून रोजी घडली होती़ याप्रकरणी सोमवारी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
रविंद्र हांड्या वळवी व सरीताबाई वळवी यांच्यावर संशय घेत अमिताभ जोमा वळवी, रतिलाल जोमा वळवी, रान्या रोडत्या वळवी, दिनेश रोडत्या वळवी, साजन रतिलाल वळवी सर्व ऱा़ जुगणी हिरीचापाडा यांनी मारहाण केली होती़ मारहाणीत पती-पत्नी जखमी झाले आहेत़ याप्रकरणी दोघांनी पोलीस पाटील प्रबलसिंग पवार यांच्यासोबत चर्चा करुन म्हसावद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ रविंद्र वळवी यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दरम्यान याप्रकरणी अमिताभ वळवी याने आधी फिर्याद दिली आहे़ तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करत आहेत़

Web Title: Beaten on suspicion of being fired from Anganwadi job