शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात ‘शिवभोजना’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाने राज्यातील जनतेच्या सोयीसाठी शिवभोजन केंद्रांची निर्मिती केली आहे़ या केंद्रांना जिल्ह्यातही प्रतिसाद ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य शासनाने राज्यातील जनतेच्या सोयीसाठी शिवभोजन केंद्रांची निर्मिती केली आहे़ या केंद्रांना जिल्ह्यातही प्रतिसाद असून चार महिने लॉकडाऊन आणि वेळोवेळी होणाऱ्या संचारबंदीतही हे भोजन निराधारांना आधार ठरू लागले आहे़ शहरासह जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांची सत्यता ‘लोकमत’ने रविवारी पडताळून पाहिली असता एक ठिकाण वगळता इतर सर्व ठिकाणी सुरळीत कामकाज होत असल्याचे दिसून आले़
जिल्ह्यातील पाच तालुक्यात प्रत्येकी दोन, एके ठिकाणी एक आणि नंदुरबार शहरात तीन अशी १२ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली होती़ पाच रूपयांच्या नाममात्र दरात अनुदानित तत्त्वावर सेवाभावी संस्थांना ही केंद्रे चालवण्यासाठी देण्यात आली आहेत़ याचा लाभ गोर-गरीबांसह गरजूही घेत असल्याचे चित्र नंदुरबार शहरात दिसून आले़ दुपारी १२ ते १ दरम्यान एका वेळेस दिल्या जाणाºया शिवभोजन केंद्रावर बºयाच अंशी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे़ जेवण विक्रीची वेळ माहिती असल्याने सर्वच ठिकाणी गरजू रांगा लावू उभे राहत आहेत़ शहरातील दोन ठिकाणी सेवाभावी संस्थेकडून तर एके ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केंद्र चालवण्यात येत आहे़ केंद्रांवर अन्न तयार करण्यापेक्षा संस्थांकडून बाहेरील किचनमधून ते तयार करुन आणले जात आहे़ ताटात वाटप करण्यापेक्षा ते पॅक करुन देण्यात येत असल्याचे यावेळी निर्दशनास आले़
शासनाकडून देण्यात येणारे हे शिवभोजन एकाच वेळेचे असल्याने ते दोन वेळेचे करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ रविवारी होणाºया संचारबंदी काळात हे केंद्र अनेकांची भूक शमवत आहे़ ४जिल्हा पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार चालवण्यात येणाºया शिवभोजन केंद्रांतून अन्न खरेदी करणाऱ्यांची नोंद केंद्र चालकांकडून केली जाते़ मोबाईलमध्ये रितसर फोेटो घेत ही नोंद केली जाते़ नंदुरबार शहरात नेहरू चौक, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिवभोजन केंद्र आहे़ याठिकाणी १० रूपयात स्वस्त जेवण देण्यात येते़ भाजी, वरण, दोन चपात्या आणि भात असा दररोजचा मेन्यू असल्याची माहिती केंद्र चालकांकडून देण्यात आली़ ४जिल्ह्यात एकूण १२ केंद्रे देण्यात आली आहेत़ यात नंदुरबार ३, शहादा, धडगाव, तळोदा आणि नवापूर येथे प्रत्येकी दोन तर अक्कलकुवा येथे १ केंद्र सुरू करण्यात आले आहे़
४अनुदानित तत्त्वावर विविध संस्थांना ही केंद्रे देण्यात आली आहेत़ यात चालकाना ८० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे़
४नंदुरबार शहरात रविवारी संचारबंदी असताना केंद्रांची माहिती घेतली़ यात नेहरू चौकातील केंद्राबाहेर १२ वाजेपासून गरजूंनी हजेरी लावली़ त्यांना पार्सलच्या रूपाने जेवण देण्यात आल्याचे दिसून आले़ याठिकाणी एका वेळी १०० प्लेट अन्न वितरण करण्याचे आदेश आहेत़
४जिल्हा सामान्य रुग्णालयात एकावेळी १०० जणांना जेवण देण्यात येते़ आदिवासी विकास विभागाच्या सेंट्रल किचनचा भार सांभाळणारी संस्था रुग्णालयाच्या आवारात हे केंद्र चालवते़ अवघ्या तासाभरात त्यांचे अन्न संपत असल्याचे सांगण्यात आले़
४कृषी उत्पन्न बाजार समितीने तेथे येणारे शेतकरी, मजूर, हमाल, व्यापारी यांच्या सोयीसाठी केंद्र सुरू केले आहे़ याठिकाणी दिवसभरात २०० थाळ्या जेवण वितरण करण्याच्या सूचना आहेत़ रविवारी हे केंद्र बंद दिसून आले़ बाजार समिती बंद असल्याने केंद्रही बंद ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले़ जिल्ह्यातील इतर १० ठिकाणीही सुरळीत अन्न वाटप केल्याची माहिती आहे़