शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन शिक्षणासाठी कनेक्टीव्हीटीचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा निश्चित कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता असली तरी येत्या १५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा निश्चित कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता असली तरी येत्या १५ जूनपासून मात्र शैक्षणिक वर्षास सुरुवात होणार आहे. याबाबत शासनाकडून वेगवेगळे पर्याय मुख्याध्यापकांना सूचविण्यात आल्यामुळे तळोदा तालुक्यात माध्यमिक शाळांचे शिक्षक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षणासाठी दूरदर्शन, स्मार्ट फोन व रेडिओची माहिती संकलीत करीत आहेत. तथापि, बहुसंख्य पालकांनी इंटरनेट कनेक्टीव्हीटीची समस्या पुढे मांडली आहे. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची अपेक्षा आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने गेल्या १५ मार्चपासून शाळा बंद केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षाही रद्द करून त्यांना मूल्यमापनावर आधारित गुण देण्यात येऊन पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. आता पुढील आठवड्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. परंतु कोरोना महामारीचे शुक्लकाष्ट अजूनही कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. उलट दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शाळा कशा सुरू करायच्या हा प्रश्न सरकार, संस्थाचालक यांच्यापुढे पडला आहे. शाळा सुरू करण्याबाबत केंद व राज्य सरकार यांच्यात दुमत आहे. केंद्र सरकार म्हणते १५ आॅगस्टनंतर शाळा सुरू कराव्यात तर राज्य सरकार १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी रेड झोन, ग्रीन झोन, आॅरेंज झोन अशा तिन्ही झोनमधील शाळांच्या बाबतीत विचार केला जात आहे. त्यासाठी दूरदर्शन, आॅनलाईन, दूरचित्रवाणी अशा पर्यायांबरोबरच दोन शिफ्ट, एक दिवसाआड अशा अनेक पर्यायांवर विचार करण्यात येऊन निदान १५ जूनपासून तरी शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्याचे निर्देश शासनाने शिक्षण विभागाला दिले आहेत. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनीही गेल्या शुक्रवारी शाळांच्या नियोजनाबाबत जिल्ह्यातील खाजगी संस्थांच्या मुख्याध्यापकांशी व्हीडीओ कॉन्फरन्सने मिटींग घेतली होती. त्यानंतर तळोदा तालुक्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शिक्षकांशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांची माहिती संकलन करण्याची सूचना दिली. त्यामुळे मंगळवारपासून तळोदा तालुक्यातील बहुतेक शाळांच्या शिक्षकांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पालकांची प्रत्यक्ष भेट घेतली. शिक्षकांनी पालकांचे स्मार्ट फोन नंबर, दूरदर्शन, रेडिओ यांची माहिती संकलीत करून आॅनलाईन शिक्षणाबाबतची माहिती दिली. त्यावेळी बहुसंख्य पालकांनी अशा महामारीत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास स्पष्ट नकारही दिला आहे. शिवाय शासन आॅनलाईन क्षिण देणार असले तरी नेटवर्क कनेक्टीव्हीटीचा मोठा प्रश्न ग्रामीण भागात आहे. त्यासाठी आधी ठोस प्रयत्न करण्याची अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. याशिवाय ५० टक्के पालकांकडे स्मार्ट फोन नसल्याचे दिसून आले. तसेच १०० टक्के पालकांकडे रेडिओ नसल्याचे समोर आले.

राज्य शासन ग्रीन झोनमधील शाळा सुरू करण्याच्या बेतात असले तरी प्रत्यक्ष शाळेत मुलांना आणण्याबाबत पालक व शाळा व्यवस्थापन समितीची संमती घेणे आवश्यक आहे. कारण अजूनही महामारीचे सावट गेलेले नाही. ते अधिकाधिक वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूबाबत पालकांच्या मनात आजही चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत पालक आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्याबाबत साशंक असल्याचे म्हटले जात आहे.