शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात उपस्थितीत झाली 45 टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 12:37 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  नवनी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. आता हळूहळू शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  नवनी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन आठवडा उलटला आहे. आता हळूहळू शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे. ५५ ते ६० टक्के विद्यार्थी उपस्थित राहू लागले असून आतापर्यंत जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहे. दरम्यान, विविध कारणांमुळे अजूनही ७२ शाळा बंद असल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात केवळ नंदुरबार जिल्ह्यातीलच शाळा गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील भितीमुळे शाळांमधील उपस्थिती १० ते १५ टक्केच्या आत राहिली होती. नंतर शाळा भरण्याचे प्रमाण नियमित झाले आही विद्यार्थी व पालकांच्या मनातील भिती देखील कमी झाल्याने आता विद्यार्थी संख्या वाढली आहे. सद्य स्थितीत जवळपास ५५ ते ६० टक्केपर्यंत वाढली आहे. येत्या आठवड्यात उपस्थिती संख्या ही ८० टक्केच्या आसपास जाण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. शाळांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत.माध्यमिक शाळांऐवजी कनिष्ठ महाविद्यालयांमधील उपस्थिती वाढत आहे. शाळांमधील अर्थात नववी व दहावीच्य वर्गात उपस्थिती ३५ ते ४५ टक्केच्या घरात आहे तर अकरावी व बारावी वर्गातील उपस्थिती ही ६५ ते ७० टक्केपर्यंत जात आहे. 

कोरोना पॅाझिटिव्हमुळे काही शाळा बंद...सुरू झालेल्या शाळांमधील काही शिक्षक कोरोना पॅाझिटिव्ह आल्याने अशा शाळांना सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील सहा शाळांचा समावेश आहे. सर्वच शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून पालकांनी विद्यार्थ्यांंना शाळेत पाठविणे आवश्यक आहे. 

जिल्ह्यातील दुर्गम भागात ॲानलाईन शिक्षणाला अनेक अडचणी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. शाळांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निसंकोचपणे शाळांमध्ये उपस्थित राहावे.-एम.व्ही.कदम, शिक्षणाधिकारी

अशी आहे उपस्थिती...बुधवार, २ डिसेंबर रोजी एकुण विद्यार्थी  १४,१७८ पैकी ७,१०९ विद्यार्थी उपस्थित होते. एकुण ४,१४१  शिक्षकांपैकी २,३८६ शिक्षक उपस्थित. १,१५८ शिक्षकेतरांपैकी १,१५५ शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित.